Sharad Pawar : शरद पवारसाहेबांचे 'चपखल पेंटिंग'; रोहित पवारांनी भाजपसह विरोधकांना सूचक सुनावले!

Painting by Sharad Pawar Tweet from Rohit Pawar : दहा जागा लढवणारे शरद पवार देशाचे नेते कसे? काय राजकारण करणार? असे सांगून शरद पवार यांचे राजकारण संपल्याचे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते. लोकसभेच्या निकालानंतर मात्र सगळेच चित्र पलटले.
sharad pawara rohit pawar
sharad pawara rohit pawarsarkarnama

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज 25 वा वर्धापनदिन नगरमध्ये साजरा होतोय. शरद पवार आगामी राजकारणाची दिशा नगरमधील कार्यक्रमातून निश्चित करतील, हे नक्की! विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, हे देखील तेवढेच खरं! राष्ट्रवादीने या कार्यक्रमाची 'जोरो की', तयारी केली आहे.

यातच आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांचे एक पेंटिंग ट्विट केलं आहे. महाराष्ट्राचा हा सह्याद्री ठामपणे आणि दृढ निश्चयाच्या निर्धाराने वादळात स्थिरपणे हात खोलून उभा असलेले शरद पवार यांचे हे 'चपखल पेंटिंग' लक्ष वेधून घेते. रोहित पवार यांचे हे ट्विट केलेले पेंटिंग विरोधकांना सूचक, असेच आहे. शरद पवार यांचे आगामी राजकारण कसे असेल हे देखील 'चपखल पेंटिंग'मधून रोहित पवार यांनी सुचवण्याचा प्रयत्न केलाय.

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच दिशेने गेले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. यानंतर भाजपने राज्यातील राजकीय दिशाच बदलवली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले. किंवा फोडले? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या निष्ठावानांनी त्यांची साथ सोडली. शरद पवार (Sharad Pawar) यांचे घरातील नाती दुभंगली. शरद पवार आणि अजित पवार, असे गट झाले. अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षचिन्ह मिळवले.

शरद पवार संपले, अशीच अवयी भाजप आणि विरोधकांनी उठवली. भाजपचे (BJP) नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शरद पवारांचे राजकारण संपले, असे म्हणत सुटले. दहा जागा लढवणारे शरद पवार देशाचे नेते कसे? काय राजकारण करणार? असे सांगून शरद पवार यांचे राजकारण संपल्याचे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते. लोकसभेच्या निकालानंतर मात्र सगळेच चित्र पलटले.

शरद पवार यांच्याविषयी राज ठाकरेंनी केलेले एक वर्णन नेहमीच लक्षात येते. ते म्हणजे, 'शरद पवार तेल लावलेला, असा पहिलवान आहे की, तो विरोधकांच्या हाताला लागतच नाही. तो खुबीने निसटतो'. तसंच काहीसे या लोकसभा निवडणुकीत झाले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार शांतपणे आणि सयंमाने आगामी राजकीय वाटचाल सुरू केली. तशी ती आखली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नोंदणी करून तुतारी वाजवणारा माणूस पक्षचिन्ह घेतले. राज्यात महाविकास आघाडीची पक्की मोट बांधली. शरद पवार यांच्या पक्षाने दहा लढवल्या आणि त्यातील आठ जागा जिंकून आणल्या. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. अपक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या 31 जागा झाल्या. शरद पवार यांची लोकसभेतील ही कमाल भाजपसह विरोधकांची दाणादाण उडवणारी ठरली. महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांनी 70 सभा घेतल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sharad pawara rohit pawar
Sujay vikhe : घायल शेर की साँसे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है! सुजय विखेंची 2029 ला पुन्हा येणारची घोषणा...

शरद पवार यांचे राजकीय वलय संपवण्यासाठी भाजपने रचलेले चक्रव्यूह एक वादळच होते. शरद पवार त्यात फसणारच, असे काहीसे वातावरण राज्यात निर्माण करण्यात आले होते. हे चक्रव्यूह शरद पवार यांनी असे भेदले की, भाजप 'चारी मुंड्या चित' झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज वर्धापनदिन होत आहे.

लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये उत्साह आहे. त्यामुळे या वर्धापनदिनात राज्यभरातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रमुख नेते पक्षाची आगामी दिशा सांगणार आहे. शरद पवार यांच्याभोवती निर्माण करण्यात आलेल्या राजकीय चक्रव्यूहात त्यांचे नातू आमदार रोहित पवार खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या कंपनीवर 'ईडी'ची कारवाई झाली. तरी ते डगमगले नाहीत.

या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी शरद पवार यांचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले 'चपखल पेंटिंग' आज ट्वि्ट केले आहे. हे पेंटिंग लक्ष वेधून घेते. वादळ असो... संकटाचे काळे ढग असो... किंवा अडचणींचा डोंगर असो.., असे म्हणत महाराष्ट्राचा हा सह्याद्री कायम न डगमगता ठामपणे आणि दृढ निश्चयाच्या निर्धाराने उभा आहे... रोहित पवार यांचे हे ट्विट विरोधकांना सूचक, असेच आहे.

sharad pawara rohit pawar
Sharad Pawar And Nilesh Lanke : शरद पवार जाम खूष; आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com