Maharashtra Government : पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? कोणाचे वर्चस्व...

Maharashtra government cabinet expansion : राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात आपले वर्चस्व ठेवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis

Mahayuti News : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महायुतीत नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यकर्ते, नेत्यांमध्ये पुन्हा जोश भरण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार 27 जूनला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी होण्याच्या चर्चा आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात सात खासदार असलेल्या शिवसेनेला ( शिंदे गट) एक राज्यमंत्री पद मिळाले. तर, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) राज्यमंत्री पद न घेता कॅबिनेट मंत्रि‍पदासाठी थांबण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक मंत्रि‍पदे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतील.

अजित पवार Ajit Pawar गटापेक्षा शिंदे गटाची कामागिरी ही लोकसभा निवडणुकीत सरस राहिली आहे. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात आपले वर्चस्व ठेवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या शिलेदारांना मंत्रि‍पदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे.

विदर्भाकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपची पिछेहाट झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपकडून विदर्भातील आमदारांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. विदर्भात जास्तीत जास्त मंत्रिपद देत जातीय समीकरणे साधून विधानसभेत यश मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Loksabha Election Result 2024 : विधानसभेला महाविकास आघाडी 164 जागा जिंकणार? लोकसभेच्या निकालाने महायुती चिंतेत

नारळ कोणाला?

लोकसभेच्या निकालानंतर तयार झालेले नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी राष्ट्रवादीने (अजित पवार गट) केली होती. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारातमध्ये समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत काही मंत्र्यांमध्ये अस्वस्था असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com