Amol Mitkari Video : 'प्रकाश आंबेडकर आणि अजित पवारांनी एकत्र यावे', दादांच्या विश्वासू आमदाराची मध्यस्थी करण्याची तयारी

Amol Mitkari Prakash Ambedkar Ajit Pawar : अजितदादा हे पुरोगामी चळवळीचे नेते आहेत. जनसन्मान यात्रेत फुले शाहु आंबेडकरांचे प्रत्येक भाषणात दादा नाव घेत आहेत. बाळासाहेब देखील चळवळीतील आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र यावेत, असे मिटकरी म्हणाले.
Prakash Ambedkar and Ajit Pawar
Prakash Ambedkar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari News : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रीत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मिटकरी म्हणाले, अजितदादा आणि बाळासाहेब एकत्र आले तर महाराष्ट्राचे चित्र नक्कीच वेगळे असेल. मध्यंतरी मी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, असा प्रयत्न केला होता.

'अजितदादा हे पुरोगामी चळवळीचे नेते आहेत. जनसन्मान यात्रेत फुले शाहु आंबेडकरांचे प्रत्येक भाषणात दादा नाव घेत आहेत. बाळासाहेब देखील चळवळीतील आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र यावेत म्हणून मी प्रयत्न केले होते. मात्र मला पाहिज तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हे दोन्ही नेते एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे.' असे मिटकरी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल त्यांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या काही अटी असतील तर त्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचे काम करू, असे देखील मिटकरी यांनी सांगितले.

Prakash Ambedkar and Ajit Pawar
Chhagan Bhujbal: भुजबळांना यावेळी निवडणूक जड जाणार; जरांगेंनंतर काँग्रेस नेत्यानं थोपटले दंड; '20 वर्ष राहिलेल्या पाहुण्याला निरोप देण्याची वेळ...'

...तर भाजपला सोडा

मिटकरी यांनी मागील वेळेस अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी वंचितची भूमिक स्पष्ट करताना भाजपसोडून सर्वांसाठी वंचितचे दरवाजे उघडे आहेत. अजित पवारांना वंचित सोबत यायचे असेल तर त्यांना भाजपची साथ सोडावी लागेल, असे वंचितकडून स्पष्ट करण्यात आले होते.

Prakash Ambedkar and Ajit Pawar
Karvir Assembly Election : करवीरमध्ये पाटील-नरकेंना अपक्ष अन् बंडखोर घाम फोडणार; सर्वाधिक भीती युतीलाच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com