

Maratha Agitation : अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेला हल्ला हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच झाला. असा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ''अचानक जाती-जातीमध्ये कशाप्रकारे भांडणं लागतील, यादृष्टीनेच राज्य सरकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. मोठ्यप्रमाणात पोलिसांनी अंतरवालीत लाठीमार केला. अशा अमानुष पद्धतीने जेव्हा पोलीस लाठीमार करतात. तिथल्या पोलीस अधीक्षकाची हिंमत असेल का अशा पद्धतीने लाठीमार करण्याचे आदेश देऊ शकतो?''
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय ''जोपर्यंत पोलीस अधीक्षकास वरून म्हणजेच गृहमंत्र्यांकडून आदेश नाही, तोपर्यंत अशापद्धतीने अमानुष लाठीमार जो आंदोलकांर झाला होता, तो कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही. गृहमंत्र्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले होते, हे त्यांनी स्वतः कबुल केलं पाहिजे. हे सरकार जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावत आहेत.'' असा आरोप अनिल देशमुखांनी यावेळी केला.
याचबरोबर, ''आपणही राज्यात गृहमंत्री पदावर होतो. एखादा पोलीस अधिकारी गृहमंत्र्याला कळविल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घेत नाही, घेऊ शकत नाही.'' असं अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.
तसेच सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने-सामने येताना दिसत आहेत. हा वाद सरकारप्रणित असल्याची टीका देशमुख यांनी केली. राज्यातील जातीजातींमध्ये वाद सुरू असताना कॅबिनेट मंत्रिमंडळातील तीन मंत्री वेगवेगळी विधानं करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य वेगळं असतं. मंत्री छगन भुजबळ काहीतरी वेगळंच बोलतात. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोघांच्या एकदम विरुद्ध बोलतात. त्यामुळं सरकारचं चाललंय काय, असा प्रश्न पडतो, असं ते म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.