Anil Deshmukh News : 'गडकरींना पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले, हे..' ; अनिल देशमुखांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!

Anil Deshmukh On Gadkari : 'भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, त्यात गडकरी, फडणवीस यांचे स्वतंत्र गट आहेत.' असंही देशमुख म्हणाले आहेत.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Nagpur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी, 'गडकरींना पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले हे संपूर्ण नागपूरला माहित आहे.' असं विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कारण, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनीही आज म्हटले आहे की, गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवली गेली आणि मोदी, शाह सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आता अनिल देशमुखांनाही याच पार्श्वभूमीवर विधान केल्याचं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anil Deshmukh
Girish Mahajan Vs Sanjay Raut News : गिरीश महाजन राऊतांवर बरसले; म्हणाले, त्यांचे डोकं तपासा...

अनिल देशमुख म्हणाले, 'महाविकासाकडे मध्ये सर्व एकत्र येऊन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवत होते. सर्वांनी एकत्र येऊन काम केलं. भाजपचा अंतर्गत वाद आहे, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे तो चर्चेचा विषय आहे. तसेच, भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, त्यात गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे गट वेगवेगळे आहे. नितीन गडकरी पडतील यासाठी काम केलं गेलं.'

काटोलमध्ये शेकाप नेते राहुल देशमुखांच्या अटकेबाबत बोलताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, काटोलमध्ये मोठ्या प्रमाणात इराणी लोकांचे अवैध धंदे आहे. मागील 25 वर्षांपासून त्यांच्यावर नियंत्रण आणलं होतं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा त्यांची गुंडागर्दी सुरू आहे.

या ठिकाणी एका तरुणीने आत्महत्या केली होती, त्या पार्श्वभूमीवर शेकाप नेते राहुल देशमुख यांनी पत्रक काढलं होत, यात त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र ही अटक राजकीय द्वेषापोटी झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा राजकीय वचपा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला, असा आरोप देशमुखांनी केला आहे.

Anil Deshmukh
Sanjay Raut News : "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल", असं कोण म्हणालं?

याशिवाय पुणे येथील आरोग्य अधिकाऱ्याच्या निलंबनाच्या प्रकरणावरही अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरोग्य खातं पोखरलं जातंय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्र्याची नांगी ठेचावी! नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. टेंडर मधील मलईसाठी एका प्रामाणिक अधिकाऱ्याचं एका मंत्र्यांनी खच्चीकरण करणे महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभत नाही. सरकारने यांना पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई करावी.' अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com