sanjay raut
sanjay rautsarkarnama

Sanjay Raut News : "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल", असं कोण म्हणालं?

Sanjay Raut Vs Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्याबाबत राऊतांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. कारण...

Mumbai News, 26 May : नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), अमित शाह ( Amit Shah ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला. त्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, असा आरोपी खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित शाह यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला, असंही राऊतांनी म्हटलं आहे. त्यांच्या या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता आमदार प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

4 जूननंतर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांचं थोबाड फुटलेलं दिसेल. राऊतांनी आपल्या पक्षाची आणि घराची काळजी करावी. हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, असं म्हणत दरेकरांनी ( Pravin Darekar ) संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"4 जूनंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, असं जाहीर सभांमधून ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी, असं चित्र उभं करू नये. राऊतांनी आपल्या पक्षाची आणि घराची काळजी करावी. हा देश आणि भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली चालतोय, हे सर्वश्रृत आहे. राऊत भ्रमिष्ट झाल्यानं प्रसिद्धीती राहण्यासाठी नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात," अशी टीका दरेकरांनी केली आहे.

"नितीन गडकरी यांच्याबाबत राऊतांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. कारण, राज्यात प्रचारात व्यस्त असताना सुद्धा फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) विजय भक्कम होण्यासा्ठी योगदान दिलं, ते नागपूरवासियांना माहित आहे. संजय राऊतांची भूमिका दुटप्पी आहे," असा हल्लाबोल दरेकरांनी केला आहे.

sanjay raut
Sanjay Raut News : 'अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंचे खास प्रयत्न', संजय राऊतांनी सांगितले 25 ते 30 कोटी वाटले

संजय राऊतांनी काय म्हटलं?

"4 जूननंतर भाजपात मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपाला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल," असा दावा संजय राऊतांनी केला होता.

sanjay raut
Sanjay Raut News : 'राज ठाकरे संघाच्या शाखेला भेट देणार की भाजपच्या?', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com