Anil Parab News: 331 अधिकारी जाळ्यात, प्रत्येकाकडे बदलीसाठी 50 लाखांची मागणी...आमदाराच्या दाव्यानं अधिवेशनात मोठी खळबळ

Assembly Winter Session 2025: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी शनिवारी (ता.13 डिसेंबर) विधिमंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नवा बॉम्ब टाकला आहे. या नव्या बॉम्बेमुळे राज्यातील महायुती सरकारही हादरलं आहे.
Anil Parab Pratap Sarnaik Devendra Fadnavis.jpg
Anil Parab Pratap Sarnaik Devendra Fadnavis.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी शनिवारी (ता.13 डिसेंबर) विधिमंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नवा बॉम्ब टाकला आहे. या नव्या बॉम्बेमुळे राज्यातील महायुती सरकारही हादरलं आहे. परब यांनी आरटीओ खात्यातील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी हिवाळी अधिवेशनात परिवहन विभागाचे (RTO) अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कळसकर यांनी आरटीओ विभागातील बदल्यांसाठी 331 अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 50 लाख रुपये मागणी केली असून त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

अनिल परब म्हणाले, राज्यातील तब्बल 331 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आरटीओचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांनी प्रत्येकी 50 लाखांची मागणी केली.महत्त्वाची बाब म्हणजे त्यापैकी पहिले 10 लाख रुपये आधी द्या,नंतर मग पोस्टिंग करतो असं कळसकर म्हणत असल्याचंही परब यांनी यावेळी सभागृहात निदर्शनास आणून दिलं. तसेच 331 पैकी 245 अधिकाऱ्यांनी कळसकर याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचंही ते म्हणाले.

याबाबत संबंधित मंत्र्यांना काहीच माहिती नसणार असंही माजी मंत्री अनिल परब म्हणाले. तसेच 245 तक्रारींची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी विधान परिषदेच्या सभागृहात लावून धरली. तसेच सरकार परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार याविषयीही विचारणा परब यांनी केली.

Anil Parab Pratap Sarnaik Devendra Fadnavis.jpg
Mahayuti alliance : महायुतीचे ठरलं; पण १३ महापालिकेत जागावाटप, महापौर, इतर पदावरून तिढा! शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात 'पॉवर' गेम सुरू!

अनिल परब यांनी म्हणाले, आरटीओमध्ये (RTO) अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेला भरत कळसकर हा अधिकारी त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं याबाबत सांगत आहे. त्याने आजपर्यंत 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं तो सांगत असून माझ्याकडे ब्रह्मास्त्र असल्याचा दावाही त्यानं केला आहे. हे ब्रह्मास्त्र नेमकं कोण आहे याविषयीची माहिती समोर आणण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी अधिवेशनात केली.

Anil Parab Pratap Sarnaik Devendra Fadnavis.jpg
Nitin Gadkari News : शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांची विधान परिषदेत एन्ट्री ? मंत्री गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी यावेळी भरत कळसकर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले, कळसकर यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचाही दावा केला.तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कधी आणि काय कारवाई करणार असा संतप्त सवालही परब यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com