Anjali Damania Video : 'अजित पवार प्रत्येकाला शहानपणा शिकवता, अंजली कृष्णनवर कारवाई झाली तर...', अंजली दमानिया प्रचंड संतापल्या

Anjali Damania  Ajit Pawar IPS Anjali Krishnan : अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांना इशारा देत म्हटले आहे की, अंजली कृष्णन यांच्यावर कारवाई केली तर सोडणार नाही.
Ajit Pawar, Anjali Damania
Ajit Pawar, Anjali Damania Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : माढा तालुक्यातील कुर्डू येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णन या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. अजित पवार यांनी अंजली कृष्णन यांनी व्हिडिओ कॉलवस संवाद साधत कारवाई थांबण्यास सांगितले तसेच तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल, असे देखील म्हटले. या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रचंड संतापल्या आहेत.

दमानिया यांनी म्हटले की, 'अजित पवार यांना काही कार्यकर्ते फोन करून सांगतात आणि तुम्ही त्या ऑफीसरला फोन करून धमकी देता. अतिशय शाॅकिंग आहे. यंग ऑफीसर तुम्हाला प्रश्न विचारता तर तुम्हाला झोंबतात. तुम्ही म्हणता की तुझं डेरिंग कसं झालं. अजित पवारांना एका गोष्टींच भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफीसर आहेत. आणि त्या उच्च शिक्षित आहेत. '

'स्वतःची पातळी सांभाळून वागलं पाहिजे. प्रत्येकाला शहानपण शिकवायलं जातात आणि तुम्ही जे केलंय अतिशय डिस्टर्ब करणरे आहे. त्या ऑफीसरला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, त्यांची बदली केली, छळ झाला तर अजित पवार आम्ही तुम्हाला सोडणार नाही.', असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

Ajit Pawar, Anjali Damania
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, मराठा समाजाला ओबीसी घटकांत आरक्षण दिल्यास वीस टक्के नोकऱ्या घटणार!

अजित पवारांनी माफी मागावी

करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? तुझे डेरिंग कसे झाले, असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी ? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे.', अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर यांची टीका

'गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णन यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे.', अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Ajit Pawar, Anjali Damania
Maratha Reservation Issue: आरक्षणावरून मंत्री, नेत्यांत हमरी तुमरी; नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणावर सोयीचे मौन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com