Anjali Damania News : सामाजिक कार्यकार्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटवरून एका मेसेजचा स्क्रिनशाॅट शेअर करत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. तानाजी सावंत यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा मेसेज अंजली दमानिया यांना रत्नदीप चव्हाण यांनी केला होता. रत्नदीप चव्हाण यांनी केलेल्या मेसेजचा स्क्रिनशाॅट दमानिया यांनी शेअर केला आहे.
आमदार तानाजी सावंत या रत्नदीप चव्हाणांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. बंद करा आता दादागिरी आणि दहशत, असे ट्विट दमानिया यांनी केले असून ते ट्विट उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
रत्नदीप यांनी दमानियांना केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ताई, मी रत्नदीप शिवाजी चव्हाण बोलत आहे. मी वाल्हा सामनगाव ग्रामपंचायतचा गटनेता आहे. ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत यांचे लोक, तसेच तालुका कृषी सभापती यांनी काल मला अमानुषपणे मारहाण केली. ताई मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी खूप दहशतीत आहे. माझे प्राण वाचवा.
रत्नदीप यांनी केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, माझ्या विरोधात तक्रारही घेत नाहीत. पोलिस स्टेशनचे लोक त्यांना स्वतःच्या दबावपोटी एफआयआर घेत नाहीत. भूम तालुका पोलिस स्टेशन जिल्हा धाराशिव. ताई माझे प्राण वाचवा मी खूप दहशतीत आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करत तानाजी सावंत यांना दहशत बंद करा, असे म्हटले आहे. दमानिया यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे. त्यामुळे शिंदे या प्रकरणाची दखल घेणार का? तसेच आरोपांवर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणे महत्त्वाचे आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.