Maharashtra Politics : 'तुमचा रात्रीशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीस अजित पवारांना म्हणाले अन्...

Devendra Fadnavis and Ajit Pawar’s funniest political exchanges : आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जयंतराव स्वत:अर्थमंत्री राहिले असून त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.17) विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. विविध क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींचा आढावा घेताना त्यांनी कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांबद्दल माहिती दिली. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर उत्पादनवाढीला कसा हातभार लावत आहे, याचे उदाहरण देताना त्यांनी ऊस उत्पादनाच्या वाढीचा उल्लेख केला.

आपल्या भाषणादरम्यान अजित पवार म्हणाले, “पूर्वी ऊस उत्पादनाचे टनेज 60-70 असायचे, पण आता ते 100 च्या पुढे गेले आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. खरं तर टनेज 145 पर्यंत पोहोचलंय, पण मी 100 च सांगितलं. नाहीतर पुन्हा कोणी म्हणेल की हा दिवसा बोलतोय की रात्री!”

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Budget Session : पटोलेंच्या ऑफरची अजितदादांनी उडविली खिल्ली; ‘तुमच्याकडं 15-20 टाळकी अन्‌ कशाचा पाठिंबा देताय?, ब्रह्मदेव आला तरी... ’

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मिश्किल टिप्पणी केली, “तुमचा रात्रीशी संबंध नाही.” यावर अजित पवारांनीही हसत हसत उत्तर दिले, “हे तुम्हाला माहिती आहे, त्यांना नाही.” या दोघांच्या विनोदी संवादामुळे संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जयंतराव स्वत:अर्थमंत्री राहिले असून त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती.

वडेट्टीवारांना सुनावले

अजित पवार म्हणाले, विजय वडेट्टीवार हे एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यासोबत काम करत होतो. पण भाषण करताना त्यांनी भावनेच्या भरात स्मारक बांधा, असे म्हटले. अरे कोणीची स्मारकं बांधा, कशाची स्मारकं बांधा. नाही तर 2029 मध्ये तुमची स्मारकं बांधायची तयारी करा. कुणाची स्मारकं. आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारकं बांधायला निघालात का?

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP Nitesh Rane : 'त्यांनी 'जय शिवराय' नाही, तर 'अल्ला हू अकबर' म्हणावं'; मंत्री नीतेश राणेंनी जयंतराव अन् कोल्हेंना डिवचलं (VIDEO)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com