
Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ते जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांवर निशाणा साधत आहेत गुरूवारी त्यांनी पुन्हा एकदा मुंडेंना लक्ष्य केले. जिल्ह्यातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत दमानियांनी मोठा दावा केला आहे.
दमानिया यांनी सोशल मीडियात पोस्ट करत मुंडेंनी आपल्या मर्जीतीलल अधिकारी परळीतील सगळ्या पदांवर बसविल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते, ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय त्यांनी साधला.
भगवान बाबांच्या नावाचा आणि कर्तुत्वाचा दुरुपयोग करुन काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणसं, या समाजाला बदनाम करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसं परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. माझा अक्षेप ह्यावर नक्कीच आहे, असे दमानियांनी म्हटले आहे.
सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जागं व्हायला हवं आणि ही माणसे फक्त समाजाचा वापर करत आहेत, हे समजून घ्यायला हवं, असे दमानियांनी यांनी म्हटले आहे. मुद्दा समजावण्यासाठी मी पूर्ण यादी देत आहे, असे सांगत दमानियांनी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन फडणवीस सरकारला केले आहे. हा समज वाईट आहे, असे माझे म्हणणे मुळीच नाही. त्यांचा फक्त वापर होतोय, हे ह्यातलं सत्य, असे दमानियांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
परळी शहर पोलिस स्टेशन प्रमुख - रवी सानप
परळी ग्रामीण पोलिस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे
परळी तहसीलदार - व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी – एस. एस. मुंडे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.