Anna Hazare: कथित मद्य घोटाळ्यातून केजरीवालांच्या निर्दोष सुटकेवर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, "आधी मी बोललो कारण..."

Anna Hazare: दिल्लीतील बहुचर्चित कथित मद्य घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया आणि इतर आरोपींचा निर्दोष सुटका झाली आहे.
 Anna Hazare
Anna HazareSarkarnama
Published on
Updated on

Anna Hazare: दिल्लीतील बहुचर्चित कथित मद्य घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया आणि इतर आरोपींचा निर्दोष सुटका झाली आहे. याप्रकरणावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं असून यापूर्वी आपण केजरीवालांवर या प्रकरणात जे भाष्य केलं होतं, त्यावर हजारे बोलले आहेत.

 Anna Hazare
IAS Officer: मोठी बातमी! अधिवेशनकाळात महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याच्या निलंबनामुळं खळबळ; कोण आहे हा अधिकारी? जाणून घ्या

माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, "न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, आमचा देश हा न्यायव्यवस्थेच्या आधारानं चाललेला आहे. न्यायव्यवस्थेनं दिलेला निर्णय हा प्रत्येक नागरिकाला मान्य करावा लागेल. न्याय आहे तो त्याला नाकारता येणार नाही. म्हणून न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असल्यानं तुम्हाला त्याला विरोध करता येणार नाही. त्यामुळं या देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर जाती, धर्म, देश, प्रांत, पक्ष असतानाही तो व्यवस्थित चालतो आहे कारण न्यायव्यवस्था. त्यामुळं न्यायव्यवस्थेच्या आधारे आपल्याला चालावच लागेल. जर न्यायव्यवस्था नसती तर गुंड, मवाली अन् दंगेखोरांचं फावलं असतं. ही न्याय व्यवस्था आहे म्हणूनच योग्य प्रकारे देश सुरु आहे. त्यामुळं मी यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत जे काही बोललो असेल तेव्हा न्याय व्यवस्थेचा निर्णय नव्हता. आता न्यायव्यवस्थेनं निर्णय दिला आहे की, त्यांचा यात काही दोष नाही त्यामुळं आपल्याला हे मानलं पाहिजे"

 Anna Hazare
Shikhar Bank Scam Update: अजित पवारांना शिखर बँक घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा; दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट'

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवालांनी भाजपवर टीका करताना आपला काहीही संबंध नसताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. यावर अण्णा हजारे म्हणाले हा त्यांचा प्रश्न आहे. माझा पक्षीय राजकारणाशी काही संबंध नाही त्यामुळं मी यावर काही बोलू इच्छित नाही. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे आमचे जुनेपुराने कार्यकर्ते आहेत. त्यामुळं समाज आणि देशाच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करत राहा असंच मी त्यांना सांगेन. हा देश स्वतंत्र होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी बलिदान दिलं आहे, त्यांना तुम्ही लक्षात ठेवायला हवं.

 Anna Hazare
Ramdas Athawale: "बाबासाहेबांचं महान स्वप्न होतं..."; आठवलेंकडून सातत्यानं प्रकाश आंबेडकरांना घातली जातेय साद; नव्या पोस्टमुळं पुन्हा चर्चा सुरु

अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, "जर सरकारला वाटत असेल की चौकशी व्हायला पाहिजे तर चौकशी झाली पाहिजे. जनता काय म्हणते त्याच्या आधारावर देश चालतो. त्यामुळं बहुमताच्या आधारे जर लोक म्हणत असतील तर ही चौकशी व्हायला पाहिजे. मी वैयक्तिक या प्रकरणात माझी बाजू सांगू शकत नाही कारण याची मला जास्त माहिती नाही, असंही पुढे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com