IAS Officer: मोठी बातमी! अधिवेशनकाळात महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याच्या निलंबनामुळं खळबळ; कोण आहे हा अधिकारी? जाणून घ्या

IAS Officer: राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे.
IAS And IPS officers  .jpg
IAS And IPS officers .jpgSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. यामध्ये राज्यातील एका बड्या IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

IAS And IPS officers  .jpg
Ramdas Athawale: "बाबासाहेबांचं महान स्वप्न होतं..."; आठवलेंकडून सातत्यानं प्रकाश आंबेडकरांना घातली जातेय साद; नव्या पोस्टमुळं पुन्हा चर्चा सुरु

नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूरमधील आमदारांनं सभागृहात पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पर्यावरणासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलं नाही कारण याची आपल्याकडं माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण हे सांगताना मुंडेंनी म्हटलं की, अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यास मी सांगितलं होतं पण त्यांनी हे काम अद्याप केलेलं नाही, त्यांना वारंवार बोलवून देखील ते यासंदर्भात माहिती देण्यास उपस्थित राहिलेले नाहीत.

IAS And IPS officers  .jpg
Women Political Leaders in India : राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांचा उदय; देशातील पक्षप्रमुख महिला नेत्या पुन्हा प्रकाशझोतात!

पंकजा मुंडेंच्या या उत्तरानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळातील सदस्य, सचिव असलेले IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या आदेशानंतर पर्यावरण विभागानं IAS सिंग यांना निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरु करुन याची फाईल मुख्यमंत्र्याकडं पाठवून दिली. त्याचबरोबर सहसंचालक IAS सतीश पडवळ यांना देखील निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यांपैकी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानं आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

IAS And IPS officers  .jpg
Senior leader Allegations : राजकारणात खळबळ! बड्या नेत्यावर पत्नीचे गंभीर आरोप; जुनं प्रेम प्रकरण भोवणार!

का दिले निलंबनाचे आदेश?

दरम्यान, आपल्या या आदेशावर स्पष्टीकरण देताना तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी सांगितलं की, "संबंधित खात्याचे अधिकारी माहिती देत नसतील, मंत्र्यांना सहकार्य करत नसतील तर हा सभागृहातील सर्व आमदारांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. अधिकारी हा किती मोठा असला तरी त्याला त्याची जबाबादरी दाखवून देणं हे आमचं काम आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com