Shikhar Bank Scam Update: अजित पवारांना शिखर बँक घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा; दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट'

Ajit Pawar News News : शिखर बँक घोटाळा कथित घोटाळा केल्याप्रकरणी अजित पवारांसह 75 जणांवर टांगती तलवार आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवाईंनी वेग पकडला आहे. यात ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींचाही समावेश आहे.यावरुन विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकार तपासयंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा हल्लाबोल करत आहे. याचवेळी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची तब्बल 12 तास ईडी चौकशी केली होती.पण एकीकडे रोहित पवारांच्या पाठीमागे चौकशीचा फेरा लागलेला असतानाच आता शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला. कर्जाचं वितरण करताना हजारो कोटी रूपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी अजित पवारांसह 75 जणांवर टांगती तलवार आहे. यात अनेक बड्या नेत्यांची नावांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या नेत्यांना क्लीन चीट मिळाली होती. अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar News
Ajit Pawar NCP : जयश्री पाटील अजितदादांच्या भेटीला; काँग्रेस फुटणार ?

शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तपासाचा प्रगत अहवाल मागवला आहे. न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला ६ जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते अडचणीत आले आहेत.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Scam) मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केल्यामुळे अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तर दुसरीकडे सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट असतानाही केवळ राजकीय सूडबुद्धीने रोहित पवार यांच्यावर ED ची कारवाई सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यात पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र,शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा तपास करायचा असं पोलिसांनी कोर्टात सांगितल होते. अजित पवार- शिंदे -फडणवीस सरकारसोबत आहेत.मात्र, पोलिसांनी यात पुन्हा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने अधिक तपासाची 'टाईमलाईन' ही मागवली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यासह शालिनीताई पाटील व माणिकराव जाधव यांनी निषेध याचिका दाखल केली होती. क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी ही विशेष याचिका केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News
Shambhuraj Desai : पाटणमधून शंभूराज देसाई फिक्स, तरी भाजपची बांधणी! महायुतीत चाललंय तरी काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com