Uddhav Thackeray : विधिमंडळात पाय ठेवायच्या आधीच ठाकरेंवर शिंदेंच्या शिलेदाराची जहरी टीका; म्हणाले, 'मेहेरबानी, ते विचारवंत...'

Nilesh Rane On Uddhav Thackeray : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. अशातच आता उद्धव ठाकरेही अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद अधिवेशनातील उपस्थितीवरून तिखट टीका केली.

  2. राणेंनी स्पष्ट सांगितले की, ठाकरे यांनी अधिवेशनाला जाणे हे त्यांच्या कर्तव्यातील काम असून ते कोणावर उपकार नाहीत.

  3. या वक्तव्यामुळे शिवसेना आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Nagpur News : राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेवर आले असून आता १ वर्ष होत आहे. दरम्यान आता राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु झालं असून आज गुरूवारी (ता.११) अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच गाजला. विरोधकांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासह कोकणातील हापूस आंब्यावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. या दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अधिवेशनासाठी दाखल झाले. यावरून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. त्यांनी व्हेरी गुड म्हणत जोरदार तोफ डागली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही एका आरटीआय अर्जावरून मुख्यमंत्री सहायता निधीत एक अब्ज रूपयांचा निधी जमा झाला मात्र शेतकऱ्यांवर केवळ ७५ हजार रूपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. यावरूनच आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून विधीमंडळात जोरदार वाद-विवाद झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावरून निलेश राणेंनी व्हेरी गुड म्हणत टोला लगावला. यावेळी निलेश राणेंनी म्हटले की, ते ही आमदार आहेत. हे त्यांचं कर्तव्य आहे, यावेच लागेल. अधिवेशनात येऊन काय हे मेहेरबानी करत नाहीत. हे कोणावर उपकार नाहीत, असे म्हणत टीका केली आहे. यावेळी त्यांनी ते आठवडाभर अधिवेशनात का येत नाहीत? असा सवाल करत आमदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते विचारवंत लोक परिषदेत आहेत. त्यांनी यायलाच हवं, असेही म्हणत ठाकरेंना स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले आहे.

Uddhav Thackeray
Nilesh Rane : कोकणातून राणे संपणार? म्हणणाऱ्यांना निलेश राणेंचा खणखणीत उत्तर, भाजप प्रवेशावरही सूचक वक्तव्य; म्हणाले, “रवींद्र चव्हाणांना…”

आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. नागपुरात भाजपची ताकद जास्त असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेतले जाणार आहे. तर नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढल्यामुळे आरोप-प्रत्यारोप झाले होते.

शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. तसेच त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून पैशाने भरलेल्या बॅगा उघडकीस आणल्या होत्या. यानंतरच भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद सुरू झाला होता. असाच वाद आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होवू नये म्हणून आता काळजी घेतली जात आहे.

यावर देखील निलेश राणेंनी वक्तव्य केलं असून त्यांनी, चांगली गोष्ट आहे आम्ही याच्याआधीच हेच सांगत होतो. जे आत्ता झालं आहे. तर हा फॉर्म्युला सगळीकडे ठरला पाहिजे. फक्त महानगरपालिकाच नाही तर जिल्हापरिषदांसाठी देखील.

जर आपण महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा लढल्या असतील तर सगळ्याच निवडणुका आपण महायुती म्हणून लढल्या पाहिजेत अशी आमची मागणी होती. तर आता असा निर्णय झाला असेल तर माझ्या सारखा सामान्य कार्यकर्ता अत्यंत समाधानी आहे. तसेच सध्या मुंबईसह इतर ठिकाणी समोर येणारी धुसफूस महत्वाची नसून जे नेते ठरवतील तसं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
Nilesh Rane : निवडणूक अधिकाऱ्याला खडसावलं, जिल्हाधिकाऱ्यांवर आगपाखड; नीलेश राणेंचं 'दबंग पॉलिटिक्स'

FAQs :

1. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का केली?
विधान परिषद अधिवेशनातील ठाकरे यांच्या उपस्थितीवरून त्यांनी “कर्तव्य आहे, उपकार नाहीत” असे म्हणत टीका केली.

2. राणेंनी नेमके काय म्हटले?
“उद्धव ठाकरे अधिवेशनाला येत आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण ते त्यांचे कर्तव्य आहे” असे ते म्हणाले.

3. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झाला?
विधान परिषदेतील उपस्थिती आणि ठाकरे यांच्या जबाबदारीच्या मुद्द्यावरून.

4. शिवसेना आणि ठाकरे गटातील वाद वाढण्याचे कारण काय?
दोन्ही बाजूंच्या नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
शिवसेना आणि ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष वादग्रस्त बनू शकतो आणि राजकीय वातावरण आणखी तापू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com