Asaduddin Owaisi Rally : ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, मोठी दुर्घटना टळली!

Asaduddin Owaisi Police : अकोल्यामधील एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेत मोठा गोंधळ झाला. त्यांनी सभेतील नागरिकांना स्टेजच्या जवळ येण्याचे आवाहन केले चेंगराचेंगरी झाली.
Police controlling the crowd after a stampede-like situation during Asaduddin Owaisi’s akola public rally.
Police controlling the crowd after a stampede-like situation during Asaduddin Owaisi’s akola public rally.sarkarnama
Published on
Updated on

Akola Owaisi Rally News : अकोल्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेदरम्यान गंभीर गोंधळाची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. भाषणादरम्यान ओवेसी यांनी उपस्थितांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. शेकडो लोक एकाच वेळी पुढे सरकल्याने सभास्थळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली.

या गोंधळात महिला, वृद्ध आणि लहान मुले अडकली. काही जण खाली पडल्याने घबराट पसरली. आयोजकांकडून योग्य नियोजन व नियंत्रणाचा अभाव असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांना परिस्थिती आवरण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

लाठीचार्जमध्ये काही नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घटनेनंतर सभास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी कार्यक्रम अर्धवट सोडून माघार घेतली.

Police controlling the crowd after a stampede-like situation during Asaduddin Owaisi’s akola public rally.
Pune municipal elections : 'पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी', शरद पवारांचा शिलेदार म्हणतो, 'त्यात काय वावगं...'

या प्रकारामुळे ओवेसी यांच्या वर्तनावर टीकेची झोड उठली आहे. बेजबाबदार आवाहनामुळेच हा गोंधळ उडाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व विरोधी पक्षांकडून केला जात आहे. सार्वजनिक सभांमध्ये नेत्यांनी संयम आणि जबाबदारीनं वागणं अपेक्षित असताना अशा प्रकारची घटना दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

आयोजकांवर कारवाई होणार

पोलिस प्रशासनाने परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं आहे. सभेला दिलेल्या परवानगीच्या अटी, सुरक्षा व्यवस्था आणि आयोजकांची भूमिका याबाबत चौकशी सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Police controlling the crowd after a stampede-like situation during Asaduddin Owaisi’s akola public rally.
Praniti Shinde : आंबेडकरांचा मोठा दावा; महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपत जाणार, फडणवीसांसोबत शिंदेंचं डील’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com