

Solapur, 04 January : महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जाणार आहेत. खासदार शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तसे डिल झाले आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महापालिकेसाठी २२ उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी सुजात आंबेडकर हे आज सोलापुरात आले होते. त्या सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर आरोप केले आहेत.
सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात भाजप आहे आणि आरएसएस जर निवडणूक लढवत असती, तर त्यांनाही हरवलं असतं. आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे. कारण खासदार प्रणिती शिंदे याही भाजपसाठी काम करतात, हे सर्वांना माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदरच खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना थांबायला सांगितलं. तीन महत्वाच्या निवडणुका येतायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतायत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. त्यानंतर प्रणिती शिंदे ह्या काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी डिल प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकर म्हणाले, तुम्हाला भाजपला पराभूत करायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे. शिंदे यांचे भाजपसोबतचे नातं खूप आतपर्यंत आहेत, गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ हिच्या लग्नात शरद पवार, गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते.
भाजप आणि काँग्रेस समोरासमोर EVM आणि रस्त्यावर लढायचं नाटक करतात. मात्र यांचे सर्व व्यवसाय एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक, यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती शिंदे यांनी प्रवेश घेतला की यांचा पक्षसुद्धा एक होणार आहे. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका, तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखं होतं, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
ते म्हणाले, मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेसबद्दल बोलत नसून तुमच्या सोलापूरबद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार शिंदे ह्या भाजपसाठी काम करतात, हे अख्या जगाला कळून चुकलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.