Pune municipal elections : 'पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी', शरद पवारांचा शिलेदार म्हणतो, 'त्यात काय वावगं...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या 22 जणांना पक्षातून काढले.
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष किंवा इतर पक्षातून उमेदवारी स्वीकारल्याचा ठपका.
पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात वक्तव्य केल्यानेही ही कठोर कारवाई करण्यात आली.
Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त करायचं असल्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी द्यायची अशी भूमिका राजकीय नेत्यांची असल्याचा पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिली तर त्यात काही वावग नाही असे विधान केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले, पुणे शहर परिसरामध्ये जो विकास झाला त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे झालीय. औद्योगीकरण आणि आयटी क्षेत्राला चालना ही पवार साहेबांनी दिलीय. त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम केलं आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले आहेत. अशाच पद्धतीने पुढील काळात देखील दोन्ही पक्ष सोबत राहतील का? यावरत बोलताना लंके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक कुटुंब आहे आणि ते कुटुंब राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सोबत राहत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी सुख दुःखामध्ये पवार कुटुंब एक होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक होत असल्याने अजित पवार यांना जेवढे समाधान आहे. तेवढेच समाधान शरद पवार यांना देखील असेल. तसेच सामान्य कार्यकर्ता हे सगळं मान्य करेल असं लंके म्हणाले.
ही आघाडी तात्पुरतीच असेल की भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतील याबाबत विचारला असता लंके म्हणाले, राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत असतं त्यामुळे राजकारणाचा भाकीत कोणी करू शकत नाही. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका घेत पुढे भविष्यात काय घडेल ते स्वीकार करायचा असतं.
पुणे महापालिकाच्या निवडणुकीत गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना लंके म्हणाले, कुणाची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा त्या प्रभागासाठी कोणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्या प्रभागातील लोकांची त्या व्यक्तीसाठी एकमुखी मागणी असेल तर त्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते.
निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा मेरिट महत्त्वाचा असतात त्याची पार्श्वभूमी ही काही असली तरी तो जर त्या प्रभागासाठी कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असेल त्या व्यक्तीला संधी दिली जाते. एखाद्या प्रभागासाठी तो व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याला उमेदवारी दिलेलं काही वावगं नाही, असं निलेश लंके म्हणाले.
FAQs :
Q1. हा वाद कोणत्या निवडणुकीशी संबंधित आहे?
➡️ पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीशी.
Q2. वादाचे मुख्य कारण काय आहे?
➡️ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा.
Q3. वादग्रस्त विधान कोणी केले आहे?
➡️ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे खासदार निलेश लंके.
Q4. निलेश लंके यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
➡️ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिली तर त्यात काही वावग नाही, असे ते म्हणाले.
Q5. या विधानाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ पुण्यातील निवडणूक प्रचारात गुन्हेगारीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

