

यंदा आषाढी वारीची सुरुवात ७ जुलैपासून होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहूहून पंढरपूरकडे होणार असून २५ जुलै रोजी पालखी पंढरपूरात दाखल होईल. यंदा संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी सोहळा पार पडणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करणार असून २४ जुलै रोजी पंढरपूरात पोहोचेल. या प्रवासादरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा १७ ठिकाणी मुक्काम असणार आहे. राज्यभरातील लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत,
आषाढी वारीनिमित्त रेल्वे प्रशासनाने वारकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने या विशेष रेल्वे सेवा प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहेत. तसेच वाढती गर्दी नियंत्रित करण्यास आणि वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासही मदत होणार आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे खान्देश आणि विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुसावळ-पंढरपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून सुटून पंढरपूरला रवाना होईल. तर परतीची गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटणार आहे. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाने दिली आहे.
नागपूर-मिरज विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०१२०५ ही २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून रवाना होणार आहे.
खामगाव-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगावहून सुटेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.