PM-FCT New: मुलांच्या आरोग्य, शिक्षणावर सरकारची डिजिटल नजर! काय आहे PM-FCT Tracker?

Amit Shah launched the PM-Family Care Tracker (PM-FCT): अमित शाह यांनी PM-Family Care Tracker (PM-FCT) प्रकल्पाची सुरुवात केली. गर्भधारणेपासून १८ वर्षांपर्यंत मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लसीकरणावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.
Amit Shah launched the PM-Family Care Tracker news
Amit Shah launched the PM-Family Care Tracker newsSarkarnama
Published on
Updated on

PM-FCT News: माहितीचा अभाव किंवा सरकारी नोंदींमधील त्रुटींमुळे अनेक वेळा गरजू व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा पूर्ण लाभ पोहोचत नाही. विशेषतः गर्भवती महिला, नवजात अर्भक, आणि लहान मुलांच्या बाबतीत ही मोठी समस्या निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी PM-Family Care Tracker (PM-FCT) या पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कोणतीही पात्र महिला किंवा मूल सरकारी योजनांपासून वंचित राहू नये, हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

काय आहे PM-Family Care Tracker?

PM-Family Care Tracker ही अशी डिजिटल व्यवस्था आहे, जी गर्भधारणेपासून ते मुलाच्या १८ वर्षांपर्यंत त्याच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणावर लक्ष ठेवणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाची माहिती एकत्र जोडली जाणार आहे. त्यामुळे विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

Amit Shah launched the PM-Family Care Tracker news
1 July New Rules: 1 जुलैपासून खिशाला फटका? 5 मोठे बदल! रेल्वे, आधार, पासपोर्ट ते क्रेडिट कार्ड; जाणून घ्या कोणते नियम बदलणार

गांधीनगरमध्ये पायलट प्रकल्पाची सुरुवात

हा पायलट प्रकल्प सध्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास तो संपूर्ण गुजरातमध्ये आणि पुढे इतर राज्यांतही लागू केला जाऊ शकतो. या प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला तर विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होईल आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा फायदा वेळेत पोहोचेल, असा दावा सरकारे केला आहे.

Amit Shah launched the PM-Family Care Tracker news
Tukaram Mundhe News: अण्णा हजारेंकडून थोपटली तुकाराम मुंढेंचं कौतुक; अन्न भेसळविरोधात मोहिमेबद्दल काय म्हणाले?

या प्रणालीमध्ये सुमारे 16 सरकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील प्रमुख योजना अशा

* प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

* जननी सुरक्षा योजना

* जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

* पीएम पोषण योजना

* मिशन वात्सल्य

* सुकन्या समृद्धी योजना

* पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन

* राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

Amit Shah launched the PM-Family Care Tracker news
Congress Reshuffle: पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी क्षणात आमदारकी सोडली : काँग्रेसकडून तब्बल 17 वर्षांनंतर राष्ट्रीय पातळीवर संधी

या योजनांचा समावेश आहे. यासाठी जन्म नोंदणी क्रमांक (Birth Registration Number) हा प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र ओळख क्रमांक म्हणून वापरला जाणार आहे.

निष्काळजीपणा केल्यास त्वरित अलर्ट

PM-Family Care Tracker या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे संबधिातांना योजनेबाबत अलर्ट करण्याची सुविधा यात आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचे पोलिओ लसीकरण राहिले, तर आरोग्य विभागाला लगेच सूचना मिळेल. तसेच एखादी मुलगी तिसरीनंतर चौथीत प्रवेश घेत नसल्यास शाळा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना (मेसेज) पाठवला जाईल. याशिवाय कुपोषित मुले किंवा विशेष काळजीची गरज असलेल्या मुलांचीही वेळेवर ओळख करून त्यांना मदत देणे शक्य होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com