Rajya Sabha Election 2024 : मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

Milind Deora : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
Milind Deora
Milind Deora sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे गट) सामील झालेले मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला होता. शिवसेनेसोबत भाजपने राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

Milind Deora
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपची अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना उमेदवारी

मिलिंद देवरा (Milind Deora) हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत 2004 आणि 2009 असे सलग दोन वेळा विजयी झाले होते. 2014 मध्ये मोदीलाटेत आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) अरविंद सावंत यांच्याकडून मिलिंद देवरा यांना पराभव पत्कारावा लागला. ते पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे महाविकास आघाडीत असल्याने ही जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याने त्यांनी काँग्रेस सोडल्याची चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून न उतरवला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.राज्यसभेच्या सहा जागांसाठी पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अजून आपला उमेदवार घोषित केला नाही.

Milind Deora
Bhandara Politics : राजीनामा सत्रानंतर पटोलेंच्या गृहजिल्ह्यात सारेच `कीप क्वाईट’ !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com