

Asif Shaikh News: NEET पेपर फुटीने सबंध देशभरात संतापाची लाट आहे. या गुन्ह्याच्या तपासात अनेक नवे संशयित पुढे येत आहेत. त्यावर विरोधकांनी आता भाजप सरकारला टार्गेट केले आहे. माजी आमदार असिफ शेख यांनी याबाबत भाजपच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे सरकार दुटप्पी वागते. खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जात आणि धर्म पाहून व्यवहार केला जातो, असे शेख म्हणाले.
नीट प्रकरणातील पेपर फुटीत पोलिसांचा तपास प्रामाणिक नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाला आहे. यातील आरोपींचे घर पाडले पाहिजे. सरकार यावर काय भूमिका घेणार? असा प्रश्न त्यांनी केला.
सरकारकडून या प्रकरणात न्याय होताना दिसत नाही. कोणताही पुरावा नसलेल्या टीसीएस प्रकरणात घरे पाडली जातात. संशयतांना अडकवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करते. मात्र पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणात फक्त कोठडी मिळते? हे योग्य आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.
'
माजी आमदार आसिफ शेख यांनी नाशिकच्या टीसीएस प्रकरणाच्या तपासाचा त्याला संदर्भ दिला आहे. प्रकरणातील संशयित निदा खान हिला मदत केल्याच्या आरोपावरून मतीन पटेल याचे औरंगाबाद येथील घर पाडण्यात आले. त्यावरून NEET च्या आरोपींची घरे केव्हा पाडणार? असा सवाल करत त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.