Beed Politics : एकाच मतदारसंघात महायुतीमधून तिघे इच्छुक, 'या'माजी आमदाराने मांडला भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, 'कोणालाही तिकीट...'

Ashti constituency Suresh Dhas Bhimrao Dhonde balasaheb ajabe :आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. मात्र, पक्षाने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही.
Suresh Dhas Bhimrao Dhonde balasaheb ajabe
Suresh Dhas Bhimrao Dhonde balasaheb ajabe Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : महायुतीमध्ये मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग झाल्याने बीड जिल्ह्यातील गणिते अधिकच बदलली आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीचा पेच आहे. आष्टी मतदार संघात आमदार बाळासाहेब आजबे आमदार असून भाजपचे माजी आमदार सुरेश धस व माजी आमदार भिमराव धोंडे हे तिघे हाबुक ठोकून असल्याने महायुतीमध्ये या मतदार संघात बंडखोरी अटळ मानली जात आहे.

आता या मतदार संघासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी वेगळाच फॉर्म्युला मांडला आहे.

महायुतीत जागावाटपाचे ठरत नसेल तर आष्टी मतदारसंघात तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत ‘होऊन जाऊ द्या एकदा सुट्टा खेळ’ असे आवाहन धस यांनी केले आहे.

आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. मात्र, पक्षाने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. गेवराई मतदारसंघ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेऊन सुरेश धस यांच्यासाठी आष्टी मतदारसंघ भाजपला घेण्याचे सुरुवातीपासून प्रयत्न आहेत.

Suresh Dhas Bhimrao Dhonde balasaheb ajabe
Sangola Political News : ...अन् मी या दोघांची गाडी पालथी करून मुंबई गाठली; शहाजीबापूंनी केले दीपकआबा, गणपतरावांना टार्गेट

त्यात गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवारांनी अगोदरच भाजपचा त्याग केला असला तरी पक्षाने गेवराईची उमेदवारीही जाहीर केली नाही. त्यामुळे आष्टीतून उमेदवारी कोणाला याचा सस्पेन्स अधिकच वाढलेला असतानाच माजी आमदार भिमराव धोंडे यांनीही एक अपक्ष आणि एक भाजप असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मेहबूब शेख यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीतील एखादा नेता या पक्षात ऐनवेळी प्रवेश करणण्याचा मार्गही बंद झाला आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार असे दुहेरी पेच आहे. त्यातच धसांच्या जवळच्याच व्यक्तींनी धसांची निवडणुकीतून माघार अशी पोस्ट केली आणि मग धसांच्या आष्टीतील घरासमोर मोठी गर्दी जमली.

कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका.आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असा आग्रह समर्थकांनी धरत घोषणाबाजी केली. त्यावर सुरेश धसांनी उमेदवारीबाबत काय होते ते पाहू. पण वरून ठरत नसले तर आम्हा तिघाही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. तसेच एकदाचा होऊन जाऊद्या सुट्टा खेळ अशी गर्जना केली.

Suresh Dhas Bhimrao Dhonde balasaheb ajabe
Congress Politics : मोठी बातमी! राहुल गांधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराज, जागावाटपाचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com