Sangola Political News : ...अन् मी या दोघांची गाडी पालथी करून मुंबई गाठली; शहाजीबापूंनी केले दीपकआबा, गणपतरावांना टार्गेट

Political News : सांगोला विधानसभा मतदारसंघात शहाजीबापू पाटलांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून यावेळी त्यांनी दीपक साळुंखे आणि माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांना टार्गेट केले आहे.
Deepak Salunkhe-Shahji Patil
Deepak Salunkhe-Shahji PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी पहावयास मिळत आहे. दोन दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात शहाजीबापू पाटलांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून यावेळी त्यांनी दीपक साळुंखे आणि माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांना टार्गेट केले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या फैरी झडतानाच शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

दीपक आबामुळे मी निवडून आलो, असे सगळीकडे सांगत आहेत. मात्र, त्यांची मला मदत झाली हे खरे आहे, पण मी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये निवडून येत आहे. 1995 साली दीपक साळुंखे, आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीमध्ये बसत होते. त्यांची गाडी देखील मी पालथी पाडून मी मुंबईला गेलो होतो, असे म्हणत शहाजीबापूंनी (Shahaji Salunke) दीपक साळुकेंवर टीका केली.

Deepak Salunkhe-Shahji Patil
MVA News : 'या' दहा जागांमुळेच बिघडतोय महाविकास आघाडीचा खेळ

मी दीपक आबांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांना काहीतरी कराव लागतंय असं म्हणून रात्री दोन वाजेपर्यंत थांबलो होतो. फोन करतोय दीपक आबांना मात्र ते दौरा आहे म्हणून सांगत आहेत. विधानसभेचे आमदार असताना कुठे गेले होते दौरे? असा सवालही शहाजीबापूंना दीपक साळुकेंना केला.

दीपक आबा मतदारसंघात टोपी घालून शेतकऱ्यांचे कपडे घालून फिरत आहेत. दीपक आबा आमदारांचं पोरगं मखमली गादीवरती तुम्ही लोळला. हे अख्ख्या सांगोल्याला माहित आहे, असं म्हणत शहाजीबापूंनी दीपक आबांची खिल्ली उडवली.

Deepak Salunkhe-Shahji Patil
Nagpur Congress: नागपूर पूर्व, दक्षिणचा तिढा कायम, काँग्रेस नेत्यांची पुन्हा दिल्लीवारी

याच्या अंगावरचा टी-शर्ट 50 हजार रुपयाचा आहे, संपूर्ण तालुक्याने तो बघितला आहे. याच्या घरात असणारे 200 बुटाचे जोड दीडशे कोल्हापुरी चप्पल हेही तालुक्याला माहिती आहे. हा कसला आलाय शेतकरी, याला कधी ज्वारी लावायची माहित आहे का? असा टोलाही शहाजीबापूंनी लगावला.

मी निवडणुकीचा महाराष्ट्र केसरी आहे आणि तुम्ही आत्ता लंगोट बांधायला शिकायला लागलाय, असा टोला शहाजीबापूंनी विरोधात असणाऱ्या दोन्ही उमेदवारांवर लगावला. तुम्ही रिंगणात उतरता आहे. मात्र तुमचे थरथरणारे पाय जनता बघत आहे. या निवडणुकीत विजय माझाच होणार आहे. अजूनही ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी विचार करावा. माझ्यासोबत यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Deepak Salunkhe-Shahji Patil
Shivsena UBT : 'शिवडी' वरून प्रचंड वाद, ठाकरेंनी साळवी नव्हे तर चौधरींनाच का दिलं तिकीट? 'हा' ठरला 'प्लसपॉइंट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com