Nawab Malik : 'पवार अन् शिंदे संपर्कात, कोणाचेही सरकार येऊ शकते'; नवाब मलिकांनी फोडला 'बाॅम्ब'

Nawab Malik NCP Election Prediction: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल, यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर आता राजकीय नेते शाब्दिक दावे करत बाॅम्ब फोडू लागलेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल, याचा नेम नाही, असे म्हणत शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. यानंतर आता विधानसभा निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती, असे कट्टर विरोधक निवडणुकीला समोरे जात आहे.

तसेच तिसरी आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांसारखे छोटे राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीला समोरे जात आहे. मनोज जरांगे यांचे राजकारण वेगळ्याच वळणावर आहे. त्यामुळे कोण कोणाच्या संपर्कात, हे आताच स्पष्ट होत नसतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

Nawab Malik
Nawab Malik : 'मला काहींनी विधानसभेत देशद्रोही म्हटले, आता मात्र...'; नवाब मलिकांचा सूचक इशारा

नवाब मलिक यांनी या मुलाखतीत वेगवेगळे दावे केले. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर काही तर्क मांडले. विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते. निवडणुकीनंतर येणारा निकाला आणि त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडमोडी देखील काहीही होऊ शकतात. भाजपचे सरकारच येईल, असे नाही.

अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत भाजपलाच साथ देतील, असे देखील आता सांगता येणार नाही. आतातर महाराष्ट्रात वेगळीच चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे वेगळे काहीतरी चालू आहे, असे महाराष्ट्रातील लोक म्हणत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर नेमकं कोणते सरकार येईल, हे आताच सांगू शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

Nawab Malik
Mahayuti News: मुख्यमंत्री शिंदे, फडणवीसांची तीन तास चर्चा; 28 मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी पडद्यामागे ठरला 'हा' प्लॅन

महाविकास आघाडीत असताना मला मंत्री केले. परंतु यानंतर मला अटक झाली. त्यावेळी अजित पवार वैयक्तिक पातळीवर माझ्या पाठिशी उभे राहिला, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच महाविकास आघाडीत मी असतो, तर मला अणुशक्ती मतदारसंघात तिकीट मिळाले नसते. मी दुरचे राजकारण जाणतो. मी राजकारण नवखा नाही, असा टोला देखील नवाब मलिक यांनी 'मविआ'ला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com