Nana Patole: संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा? शहरी नक्षलवादावरून पटोलेंनी फडणवीसांना फटकारलं

Nana Patole criticized Devendra Fadnavis : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोले यांचा जोरदार पलटवार.
Patole Vs Fadnavis
Patole Vs FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. राहुल गांधी हातात घेऊन फिरत असलेल्या संविधानाच्या लाल रंगावरून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दौरा शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी असल्याची टीका केली.

यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. "लाल रंग हा हिंदू धर्मात शुभ मानला जातो आणि संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा, हे संविधान विरोधी लोकांना ठरविण्याचा अधिकार नाही", असा टोला काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) नागपूर दौऱ्यावर येताच निशाणा साधला होता. संविधानाचे पुस्तकाचा रंग लाल का, असा प्रश्न करून नेमका काय इशारा देत आहात, असा सवाल करत राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधी यांचा दौरा शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणारा असल्याची टीका केली होती. यात काँग्रेसला फडणवीस यांची टीका चांगलीच झोंबली आणि सडेतोड उत्तर दिलं.

Patole Vs Fadnavis
Rahul Gandhi News : 'देशात निश्चितपणे जात जनगणना होईल, 50 टक्के आरक्षणाची भिंत तोडून टाकू'

राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर आले असताना, ते संविधान संमेलनात सहभागी झाले होते. भाजपने (BJP) केलेल्या टीकेला काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, "शहरी नक्षलवादावर जे बोलत आहेत, त्यांना देखील माहीत आहे की, राहुल गांधी देश जोडण्याचे काम करत आहे. यातूनच भाजप राहुल गांधी यांना घाबरत आहे. भाजपने नेहमीच संविधानाचा विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यावर यांनीच संविधान जाळले होते. संविधानाला जाळणारे अजूनपर्यंत यांना मिळालेले नाहीत". त्यामुळे संविधान जाळणाऱ्यांना जो संविधान वाचवायला निघाला आहे, तो नक्षलीच दिसणार, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला.

Patole Vs Fadnavis
US Election 2024 : अमेरिकेन प्रतिनिधी गृहात भारतीयांचा प्रभाव वाढला

पटोलेंकडून फडणवीसांच्या विधानाचा निषेध

"भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करतो. देशात अनेक भागात डावी विचारसरणीचे लोकप्रतिनिधी आहे. केरळमध्ये डाव्या विचारांचे सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील पूर्वी डाव्या विचारांचे सरकार होते. संसदेत अनेक भागातून डाव्या विचारांचे लोकप्रतिनिधी आहे, त्या सर्वांना त्यांना नक्षलवादी म्हणायचे आहे का? भाजपला कोणालाही प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही", असा नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

हिंदू धर्मात लाल रंग शुभ

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी घेऊन फिरत असलेल्या संविधानाच्या रंगावर देखील टीका केली. लाल रंगाचे संविधान, पुस्तक घेऊन फिरत असलेले राहुल गांधी नेमका काय इशारा देत आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर नाना पटोले म्हणाले, "संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा, हे संविधान विरोधी लोकांना ठरवण्याचा अधिकार नाही. लाल रंग हा हिंदू धर्मात शुभ मानला जातो". तसेच संविधानालाच नक्षलवाद ठरवत असतील, तर देवेंद्र फडणवीस यांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...

"भारत जोडो हा एक समूह आहे. यात अनेक संघटना असून, कडवट डाव्या विचारांच्या संघटना यात आहेत. या संघटनांची कामाची पद्धत पाहिल्यास अराजकता पसरवण्याचे काम करते. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा आम्ही सन्मानच करतोच. पण तुम्ही लाल संविधान दाखवून,लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो 'ऑर्डर', तर 'एनआरके'चा अर्थ 'डिसऑर्डर' असा आहे. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली समाजामध्ये अराजकता पसरविणाऱ्यांना एकत्र केले जात आहे. शहरी नक्षलवादाचा अर्थ वेगळा नाही. लोकांची मनात द्वेष निर्माण करायचा, अराजकता निर्माण करायची. देशाच्या संस्था, व्यवस्थेवरील विश्वास उडेल आणि कुठेतरी देशाच्या एकतेला ठेच पोचवण्याचे काम या अराजकतेच्या माध्यमातून सुरू आहे", असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com