BJP Candidate List : भाजपचे दिग्गज नेते 'या' मतदारसंघातून लढणार, यादीत पहिलं नाव देवेंद्र फडणवीसांचे तर दुसरं...

Maharashtra Elections 2024 : पहिल्या यादीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत.
Chandrakant Patil | Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis |  Ashish Shelar
Chandrakant Patil | Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis | Ashish Shelar Sarkarnama
Published on
Updated on

BJP News: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी देण्यात आली आहे. या यादीचे वैशिष्टे म्हणजे यादीमध्ये पहिलेच नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून यादीती दुसरे नाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आहे.

पहिल्या यादीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत.

आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते याच मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आशिष शेलार यांचे मोठे भाऊ मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे.

Chandrakant Patil | Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis |  Ashish Shelar
Phulambri Assembly Constituency 2024 : फुलंब्रीत भाजपने दाखवला `नारीशक्ती`वर विश्वास ; पण विरोधकांचे कडवे आव्हान

चंद्रकांत पाटील यांना पुन्हा कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, आनंदाची भावना आहे. ही आनंदाची भावना उमेदवारी मिळण्यापेक्षा पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा कोथरुडमधून निवडणूक लढण्याविषयी विश्वास दाखवला. पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवणे ही कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट असते. पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवल्याचा आनंद आहे.

2019 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना 2009 आणि 2014 मध्ये नेतृत्व केलेल्या कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. येथील भाजपचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम कदम यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची चर्चा होती. मात्र, राम कदम यांना पुन्हा पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

तर, पर्वती मतदारसंघावर देखील भिमराव तापकीर यांनी दावा सांगितला होता. त्यामुळे माधुरी मिसाळ यांना संधी मिळणार की नाही याविषयी चर्चा होती. मात्र, माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Chandrakant Patil | Chandrashekhar Bawankule | Devendra Fadnavis |  Ashish Shelar
Vidhansabha Election 2024 : लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा नांदेडमध्ये `सेफ गेम`!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com