Raj Thackeray : विधानसभेसाठी राज ठाकरेंची महायुतीकडे 20 जागांची मागणी? मुंबईत निवडणूक लढण्यास इच्छुक

Raj Thackeray Demand For 20 Seats : मुंबईतील दादरमधून नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS News : महायुतीकडे विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मुंबई परिसरातील जागांवर मनसे निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे वृत्त 'साम' टीव्हीने दिले आहे.

मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या जागांवर मनसेकडून जागांच्या मागणी करण्यात आल्याचे 'साम'च्या वृत्तात म्हटले आहे. मुंबईतील दादरमधून नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, शिवडी आणि नाशिक मतदारसंघातून बाळा नांदगावकर इच्छुक असल्याची माहिती आहे.

मुंबई तसेच मुंबई उपनगरांसह नाशिक तसेच पुणे शहरातील जागांची देखील मनसेकडून मागणी करण्यात आल्याचे 'साम'ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी Narendra Modi महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. राज ठाकरेंने महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा देखील घेतल्या.

Raj Thackeray
Manoj Jarange Patil :...अन्यथा 'करेक्ट' कार्यक्रम करू; जरांगे-पाटलांचा इशारा कुणाला?

महायुतीला महाराष्ट्रात यश मिळाले नसले तरी राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. नारायण राणे यांनी तर राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार देखील व्यक्त केले.

एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. मात्र, भाजपच्या BJP जागा कमी झाल्या आहेत. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला मनसेला निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून मनसेचे नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. तसेच विधानसभा अजून बाकी असल्याचा इशारा देखील मनसे नेत्यांकडून भाजपला देण्यात आला होता.

Raj Thackeray
Rajya Sabha Seat: राष्ट्रवादीत खलबतं; राज्यसभेसाठी भुजबळ की सिद्दीकी? कोणाची लागणार वर्णी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com