Sada Sarvankar Video : मोठी बातमी!...तर सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार

Sada Sarvankar Amit Thackeray : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी महायुतीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले पाहिजेत. मात्र, ते (मनसे) आमच्या विरोधात उमेदवार देत असतील तर सहकार्याची अपेक्षा करू नये, असे सदा सरवणकर म्हणाले.
Eknath Shinde, Sada Sarvankar, Amit Thackeray
Eknath Shinde, Sada Sarvankar, Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sada Sarvankar News : माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत, मनसेकडून अमित ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव असल्याची चर्चा आहे. यामध्ये सदा सरवणकर यांनी मोठी घोषणा केली आहे.

मनसेने सगळ्याच ठिकाणी महायुती विरोधात उमेदवार उभे केले आहेत. ते त्यांनी मागे घ्यावेत. त्यानी उमेदवारी मागे घेतल्यास मी पक्षासाठी माझी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, असे सदा सरवणकर म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी महायुतीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले पाहिजेत. मात्र, ते (मनसे) आमच्या विरोधात उमेदवार देत असतील तर त्यांनी सहकार्याची अपेक्षा करू नये.आम्हाला ठाकरे कुटुंबाचा आदर आहे. मात्र, सगळीकडे आमच्या विरोधात उमेदवार उभे करायचे आणि इकडे सहकार्य मागायचं ही भूमिका योग्य नाही, असा टोला देखील सरवणकर यांनी लगावला.

सदा सरवणकर म्हणाले, आमचा एक एक आमदार वाढणं महत्वाचं आहे. भाजप देखील आमच्या सोबत आहे. युतीचा धर्म पाळावा लागेल असे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Eknath Shinde, Sada Sarvankar, Amit Thackeray
Manoj Jarange Patil News : ठरलं.. सगळ्या उमेदवारांना अंतरवालीत बोलावले, उद्या होणार नावांची घोषणा!

सोमवारी होणार चित्र स्पष्ट

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख चार नोव्हेंबर आहे. त्यामुळे त्या दिवशी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेणार याचे चित्र स्पष्ट होईल. सदा सरवणकर यांनी मला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा असून मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार की दुरंगी हे चार नोव्हेंबरलाच कळणार आहे.

Eknath Shinde, Sada Sarvankar, Amit Thackeray
Shivsena News : राज्यातील सत्तेचा महामार्ग ठरविणार 'या' 49 जागांवरील लढती; उद्धव सेना की शिंदे सेना ठरणार वरचढ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com