Assembly Election Voting : मतदार ओळखपत्राशिवाय इतर 12 प्रकारचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य; वाचा यादी...

Maharashtra Election Commission Voting Documents Identity Card : मतदानासाठी 13 ओळखपत्रांपैकी किमान एक ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करता येणार नाही.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीचा प्रचारासाठी जेमतेम काही तास उरले आहेत. तर मतदानाही दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. त्यामुळे ऐनवेळी ओळखपत्राअभावी मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आतापासूनच तयारी करा. तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर इतर 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. हे पुरावे कोणते, हे पाहूयात.

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेबर रोजी मतदान होणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाला आपला हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे त्यांना निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर तुम्हाला मतदान करता येणार आहे.

Maharashtra Assembly Election
BJP On Hindutva: 'हिंदुत्वाचे कार्ड' कुणाचे पत्ते ओपन करणार; 'व्होट जिद्दाद' भाजपला तारणार का?

निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, त्यांना हे ओळखपत्र दाखवल्यानंतर सहजपणे मतदान करता येईल. ज्या मतदारांकडे हे ओळखपत्र नसेल, त्यांना ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रात दाखवावा लागेल. मतदारयादीतील नाव, छायाचित्र आणि तुम्ही दिलेल्या ओळखपत्रातील नाव व छायाचित्राची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला मतदान करता येईल.

अनिवासी भारतीयांना मात्र त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. एखाद्या मतदाराने मतदारयादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असला तरी आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र, त्या व्यक्तीचे नाव सध्याच्या पत्यासह मतदारयादीत असणे आवश्यक आहे.

Maharashtra Assembly Election
Devendra Fadnavis : ...म्हणून फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, शरद पवारांच्या नेत्याने सांगितलं कारण

कोणते आहेत इतर 12 प्रकारचे पुरावे?

  1. आधार कार्ड

  2. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र

  3. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक

  4. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

  5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

  6. पॅन कार्ड

7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड

8. पारपत्र (पासपोर्ट)

9. निवृत्तीवेतनाची दस्तावेज

10. केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र

11. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,

12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com