BJP On Hindutva: 'हिंदुत्वाचे कार्ड' कुणाचे पत्ते ओपन करणार; 'व्होट जिद्दाद' भाजपला तारणार का?

BJP uses religion issue in election campaign: भाजपने निवडणुकीत धर्माचा मुद्दा लावून धरला आहे. भाजपची "बटेंगे तो कटेंगे" ही घोषणा मतदारांपर्यंत पोहचली आहे. तर दुसरीकडे काँग्रेससोबत महाविकास आघाडीने आपला जुनाच फॉर्मूला प्रचारात वापरला आहे.
BJP on Hindutva Card
BJP on Hindutva Card Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अन् महायुतीने जोरदार ताकद लावली आहे. गेल्या काही विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर मुस्लिम व्होट बँकने भाजपला जवळपास नाकारल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे.

भाजपच्या निशाण्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आहे. हिंदु मत एकत्र झाली तर आपला विजय नक्की आहे, असा विश्वास भाजपला आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान यांच्यासारखे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत.

भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन यादव, हिमंता बिस्वा सरमा आदींनी प्रचारात सहभागी झाले आहेत. भाजपने निवडणुकीत धर्माचा मुद्दा लावून धरला आहे. भाजपची "बटेंगे तो कटेंगे" ही घोषणा मतदारांपर्यंत पोहचली आहे. तर दुसरीकडे काँग्रेससोबत महाविकास आघाडीने आपला जुनाच फॉर्मूला प्रचारात वापरला आहे.

BJP on Hindutva Card
Hadapsar Assembly Election 2024: मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय; हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड

महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या ११.५६ टक्के मुस्लिम समाज आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघापैकी 38 मतदारसंघात मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरतात. या मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे. नऊ विधानसभा मतदारसंघात 40 टक्के मुस्लिम मतदार आहेत.

2019 च्या निवडणुकीत काय झाले ?

2019 च्या निवडणुकीत 38 मुस्लिम बहुल मतदारसंघात 11-11 जागांवर भाजप आणि काँग्रेसने विजय मिळवला होता. 9 जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादी 3, सपा आणि एमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.

मुस्लिम बहुल असलेल्या 38 जागांवर केवळ आठच मुस्लिम उमेदवार निवडणूक आले होते. विशेष म्हणजे मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या १० जागांवर काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.

BJP on Hindutva Card
Uddhav Thackeray Exclusive Interview: ठाकरे पुन्हा CM होणार की शिवसैनिकाला CM करणार? VIDEO पाहा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 38 जागांपैकी 20 जागांवर भाजपचे मताधिक्क वाढले होते. तर एका अहवालानुसार मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, औरंगाबाद मध्य, अकोला, परभणी आणि बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मतांमध्ये 10 टक्के घसरण झाली आहे.

शिवसेना स्थापन झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात सर्वात प्रथम 'हिंदुत्व कार्ड'हा मुद्दांवर ठामपणे भूमिका घेतली होती आता उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत असल्याने हिंदुत्व आणि सावरकर या मुद्यांवरुन भाजपने त्यांना धारेवर धरलं आहे.

दोन आघाड्या दोन प्रमुख मुद्दे

आघाडी आणि महायुती यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, आदिवासी, दलित यांच्यावर भर दिला आहे. पण प्रचारात 'हिंदुत्व' हाच प्रमुख अजेंडा आहे. बंटेंगे तो कटेंगे आणि कलम 370 हे दोन प्रमुख मुद्दे भाजपचे आहेत, तर जनगणना, संविधान वाचवा हे प्रमुख मुद्दे काँग्रेसचे आहेत.

'एक है तो सेफ है"

'बंटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है" हा नवा नारा महाराष्ट्रात दिला आहे. दलित- आदिवासी यांच्यात फूट पाडण्याचा आरोप काँग्रेसवर मोदींनी केला आहे. विदर्भात महाविकास आघाडीने दलित-मुस्लिम-कुणबी यांचा सोबत घेत प्रचार सुरु केला आहे. अन्य ठिकाणी मराठा-मुस्लिम-दलित या फॉर्मूल्यावर आघाडीवर आपली रणनीती आखली आहे.

मनोज जरांगे 'गेम' करणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नाराजी फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात 29 विधानसभा या अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित आहेत. महाराष्ट्रात 14 टक्के दलित समाज आहे, ते कुणाला कौल देतात, यावर निकालाचे चित्र बदलणार आहे.

बटेंगे कटेंगे चालले नाही...

भाजपचा पाय खोलात गेला आहे. बटेंगे कटेंगे चालले नाही, पंकजा मुंडे, अजितदादा पवार यांनी विरोध केला. योगी यांच्या मराठवाड्यातील काही सभा रद्द कराव्या लागल्या. मोदी मधुनच गायब झाले आहेत. सोयाबीन, कापसाचे भाव पडले आहेत, मराठा आरक्षन आंदोलन यासाठी हिंदुत्व कार्ड आहे. चालेल की नाही, यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com