Nitesh Rane : 'हिंदूंचा गब्बर राणें'नी सांगितली हिंदूंची 'कट्टर' व्याख्या; काय रिअ‍ॅक्शन येणार?

BJP MLA Nitesh Rane explained the definition of Hindus : भाजप आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या धडाकेबाज मुलाखतीत हिंदूंची व्याख्या सांगताना दिलेले संदर्भ चर्चेत आले आहेत.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : '50-50 कोसो दूर जब बच्चा रोता था, जिहादी ओं की माँ बोलती है, सो जा नहीं तो हिंदूंओं का गब्बर आ जायेगा', अशा डाॅयलाॅग सुनावत भाजप आमदार नीतेश राणे यांनी हिंदू समाजाबद्दल आणि धर्माबद्दल हा धाक असलाच पाहिजे, असा ठाम मत मांडले.

'हिंदूचे रक्षण करणे, यासाठी हिंदूंनी तिसरा डोळा उघडलाच पाहिजे, अशी हिंदूंची व्याख्या सांगून हिंदूंनी नियम पाळायचे, संविधानामधील नियम देखील पाळायचे, सर्व काही नियम हिंदूंसाठी मग यांना काय? असा सवाल करत हा 'हिंदूंचा गब्बर' शेवटपर्यंत हिंदूंसाठी लढणार अशी भूमिका नीतेश राणेंनी मांडली.

'सकाळ माध्यम समूह'च्या 'सरकारनामा' आणि 'साम डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीत भाजप आमदार नीतेश राणे यांनी धडाकेबाज मुलाखत विचार मांडले. "हिंदू (Hindu) समाजाबद्दल जिहादी मानसिकतेची रोहिंगे, बांगलादेशी मुसलमान आहेत, ते ज्यापद्धतीने हिंदू सणांवर दगडफेक करणे, हिंदूंना घरात, वसाहतींमध्ये गणेश जयंती, नवरात्र नका साजरी करू किंवा लव जिहाद, लँड जिहाद, तसंच जनसंख्या जिहादच्या माध्यमातून हिंदूंवर अतिक्रमण करत आहेत. जनसंख्या जिहादच्या माध्यमातून हिंदू राष्ट्रातील हिंदूंची संख्या कमी करण्याचे षड्यंत्र आहे, या जिहादी मुसलमांनी सुरू केले आहे. हिंदू समाजाने जागृती झालं पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे. जेणे करून कुठलाही जिहादी आपल्या धर्माकडे वाकड्या नजराने पाहणार नाही. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे, 'सो जा नहीं तो हिंदूंओं का गब्बर आ जायेगा", अशी हिंदू धर्म आणि समाजाच्या रक्षणासाठी आक्रमक भूमिका नीतेश राणे यांनी मांडली.

Nitesh Rane
Worli Assembly Election : आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीची मोठी रणनीती, थेट शिंदेंच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात?

भाजप (BJP) आमदार नीतेश राणे यांनी हिंदू या संकल्पनेची व्याख्या देखील सांगितली. 'हिंदूचे रक्षण करणे, यासाठी हिंदूंनी तिसरा डोळा उघडलाच पाहिजे, हीच माझी हिंदूंची व्याख्या आहे, असे नीतेश राणेंनी सांगितले. 'भाईचारा, सर्वधर्म समभाव, गंगा-जमूना तहजीब, हिंदूंनीच नियम, कायदे पाळावेत, भारतरत्ना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देखील हिंदूंनीच पाळावा, आमच्याच हिंदू सणावेळी दगड मारणा, आमच्याच हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना करणार, आमच्याच हिंदू माता-भगिनींवर लव जिहाद करणार, आमच्याच हिंदूच्या जमिनीवर लँड जिहाद करून मशिदी बांधणार. मग, त्यांच्या सणावेळी, ईदच्या जुलूसवर हिंदू धर्माच्या लोकांनी कधी दगड मारला आहे का?', असा प्रतिप्रश्न नीतेश राणेंनी केला.

Nitesh Rane
Zeeshan Siddique : गृहमंत्री फडणवीसांची भेट, काही क्षणातच झिशान सिद्दिकींची 'ती' पोस्ट, नेमकं काय सुचवायचंय..?

नियम सर्वांनाच सारखे हवेत

'हिंदू सहिष्णूता फक्त हिंदूंनी पाळावी. त्यांच्या धर्मियांबद्दल आम्ही सन्मान ठेवयाचा. आम्ही काही बोललो, तर आमच्या लोकांना मारून टाकायच्या धमक्या देणार, सर तन से जुदा, अशा घोषणा देणार, आणि आम्ही आमच्या देवी-देवतांसारखच मैहमंद पैगंबरांना मनतो. एवढं केलं, तरी त्यांच करत राहयचं, असे सांगून प्रत्येक जिल्ह्यात ही लोक हिंदू धर्माच्या सणांना विरोध केल्याच्या शंभर घटना झाल्याचा दावा करत हिंदू समाजाला जो नियम, तोच मुसलमान समाजाला लागला पाहिजे, असे नीतेश राणेंनी म्हंटले.

हिंदूंना देखील अधिकार

मुसलमान त्यांचे सण-उत्सव साजरा गुण्यागोविंदाने करत आहेत, तर तो अधिकार हिंदूंना नाही का? हा अधिकार मागायला गेलो की, मग आम्हाला गंगा-जमुना सद्भावनेचे लेचर ऐकावं लागतं. त्यामुळे हिंदू समाजाच्या जागृतीसाठी 'हिंदू गब्बर'ला यावं लागते, असे नीतेश राणेंनी आवर्जुन सांगितले.

शरिया कायदा आणू देणार नाही

कायदा काय आम्हीच पाळायचे का? हिंदूंच्या सणाला पोलिस येऊन डिजे, स्पीकर बंद करतात. त्यांच्या मोहरमच्या मिरवणुकांमध्ये असे बंद होतात का? मशिदीवर भोंग्यांचा आवाजात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादा पाळतात का? महसूलच्या जमिनी, गायरानच्या जमिनी, सरकारच्या जमिनींवर, रस्त्याच्या दुभाजकांवर हे लोक अनिधिकृत धर्मस्थळ उभी करतात. स्वतः जागा घेऊन यांनी धर्मस्थळ बांधा. हीच लढाई आहे. हाच संघर्ष आहे. यासाठी हिंदू सकल मोर्चे निघतात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कायदा पाळायचे नाहीत. पाकिस्ताना आणि बांगलादेशामधील शरिया कायदा इथं आणायचा आहे. तो आम्ही आणू देत नाही, म्हणून हे सर्व उद्योग आणि संघर्ष सुरू आहे, असा गंभीर आरोप नीतेश राणे यांनी केला.

हिंदूंविषयाकडे पाहण्याचा चष्मा बदला

'माझ्या वक्तव्याने हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल, तर त्यांनी कायदे, नियमांचे पालन करावे. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, हिंदू सणांवर दगड फेकू नये, आम्ही कायदे पाळतो, तसे त्यांनी पाळावेत. जेव्हा हे कायदे पाळतील, तेव्हा माझे अशी विधान दिसणार नाही. हा हिंदूराष्ट्र आहे. इथं सर्वधर्म समभाव चालणार नाही. इथं हिंदूंना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये तसंच होते. तिथं हिंदू समाजाला विचारलं जात नाही', याची आठवण नीतेश राणेंनी करून दिली. तुम्ही आम्हाला 'सर तन से जुदा' बोलला, तर आम्ही 'चुन चुनके मारेंगे' बोलणार, तुम्हाला जी भाषा कळते, तिच भाषा तुम्हाला सुनावणार, असे सांगून हिंदूच्या देशात राहायचं आहे, तर हिंदूंचा कायदाच पाळावा लागणार. हिंदूंचे विषय कोणत्याही निवडणुकीशी संबंधित नाही. हा विषय ज्याचा, त्याचा चष्म्यातून पाहण्याचा आहे, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com