Worli Assembly Election : आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीची मोठी रणनीती, थेट शिंदेंच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात?

Mahayuti Strategy For Worli Vidhan Sabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने रणनीती आखायला सुरूवात केली आहे. त्यानुसार आता वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी सध्या भाजप आणि शिंदें गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Assembly Elections 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने रणनीती आखायला सुरूवात केली आहे.

त्यानुसार आता वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Assembly Constituency) आदित्य ठाकरेंच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी सध्या भाजप आणि शिंदें गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) पराभव करु शकेल, अशा उमेदवाराची चाचपणी या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून शायना एन सी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुती कोणता मोहरा उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीच्या जागावाटपातील सूत्रानुसार वरळी विधानसभेची जागा शिंदे गटाकडे जाणार हे निश्चित आहे.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Sanjay Raut : पुण्यातील टोलनाक्यावरून पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी शिंदे गटातील आमदाराचे? राऊतांचा रोख कुणाकडे?

त्यामुळे शायना एन सी यांना उमेदवारी मिळणार की नाही? याबाबत प्रश्न आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गरज पडल्यास वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मैदानात उतरवलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबतची स्पष्टता अद्याप झालेली नाही.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Maharashtra Assembly Election 2024: संदीप नाईक यांनी वाजवली 'तुतारी'; निलेश राणे उचलणार 'धनुष्यबाण'

दुसरीकडे वरळीतून मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील इच्छुक आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात मतांचं विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप मनसेची मदत घेण्याचा प्रयत्न करणार की मनसेला डावलून हा मतदारसंघ महायुती लढणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com