Maharashtra Congress News : संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तोंडाला काळे फासले आले. संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवधर्मच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणाला होतात, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? असा टोला त्यांनी लगावला. (Congress) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. संभाजी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याने काळं फासल्याचा दावा करण्यात आला आहे.
'संभाजी ब्रिगेड' नावामुळे संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याने शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अक्कलकोटमध्ये घडलेल्या या प्रकारावर हर्षवर्धन सपकाळ यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. (Harshvardhan Sapkal) छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो.
मुख्यमंत्री फडणवीस 'महाराष्ट्र आता थांबणार नाही'म्हणाला होतात, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा सपकाळ यांनी दिला. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर संताप व्यक्त करतांना म्हटले आहे.
फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे आले होते. त्यांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता. प्रवीण गायकवाड यांच्या सत्कार समारंभाच्या दरम्यानच त्यांना काळं फासण्यात आले. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली असून, गाडीची काच फुटली आहे. त्यांच्या अंगावरचे कपडे फाटेपर्यंत धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.