Nagpur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आपल्याकडे ठेवले आहे. गडचिरोलील स्टील सिटी बनवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी गडचिरोलीच्या सर्वात दुर्गम भागाला भेट देऊन आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र, यामागे काँग्रसला वेगळीच शंका आहे. सुरजागडच्या खदानीतून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी आणि गडचिरोलीला फडणवीसस्थान बनवण्याचा डाव त्यांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले सपकाळ म्हणाले, 'सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) मिरवतात. पण ते ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलीचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते, असा आरोप सपकाळ यांनी केला.
मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बीण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदूषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खदानीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीकास्र सोडले. ते ११ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे, महागड्या वस्तू वापरतात, असा घणाघाती हल्लाही सपकाळ (harshvardhan Sapkal) यांनी चढवला.
.
विधानसभा निवडणुकीतील मत चोरीची चौकशी करावी, यासाठी काँग्रेस पक्षाने आजपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. गुरुवारी गडचिरोलीत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुभाष धोटे, गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.