
Solapur, 13 July : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे आज (ता. 13 जुलै) शाई ओतण्यात आली आहे. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त यांच्याकडून गायकवाड यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली आहे. एक शिक्षण संस्थेच्या आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्या वेळी ही घटना घडली.
प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad ) हे संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष असून ते आज अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई ओतण्यात आल्याची माहिती आहे.
प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड या आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक होते. त्याचबरोबर गायकवाड यांनी अक्कलकोटच्या (Akkalkot) स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा राग देखील पदाधिकाऱ्यांच्या मनात होता
स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल संतापाची भावना होती. संभाजी ब्रिगेड नाव हटविण्यात यावे, यासाठी यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात यापूर्वी उपोषण, आंदोलन देखील केले होते. त्यामुळे शिवधर्म फाउंडेशनच्या पदधिकाऱ्यांचा राग गायकवाड यांच्यावर होता.
दरम्यान, फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड हे आज (ता. 13 जुलै) अक्कलकोट येथे आले होते. तसेच, गायकवाड यांचा आज सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे आले होते.
प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते, त्याचवेळी आलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर, अंगावर शाई ओतली आणि घोषणा दिल्या. हा प्रकार सर्वांसमोर एका चौकात झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.