

chhatrapti sambhajinagar News : राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू अजित व पुतण्या अमेय या दोघांना पैठण तालुक्यातील बिडकीन जवळील खेंडेवाडी येथे काही तरूणांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत सावे याचा पुतण्या अमेय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलीसांनी बिडकीन येथे तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. हे तीनही आरोपी फरार होते, पोलीसांनी वेगवान तपास करत अहिल्यानगरजवळून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका अल्पवयीन आरोपीलाही या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान, हा हल्ला करण्यात आला होता. अमेय अजित सावे यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात तीन आरोपांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल फिर्यादीनुसार पैठण तालुक्यातील बाबुळगाव ते नायगव्हाण रोड येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादात अमेय सावे यांना लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले होते.
या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलीसांनी शोध घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेजवळून या तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. भालचंद्र ताराचंद सत्तावन्न, संग्राम उर्फ करण अशोक परदेशी व एक अल्पवयीन आरोपीचा यात समावेश आहे.
मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या भावाला आणि पुतण्यालाच मारहाण झाल्याने पोलीसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. सावे यांनी खंडणासाठी सक्रीय असलेल्या गावातील गुंडाकडून माझ्या भावाला आणि पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तर ग्रामस्थांनी मात्र अतुल सावे यांचे बंधू अजित सावे, पुतण्या अमेय यांनीच दोन वर्षापासून रस्ता अडवून ठेवल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.