High Court News : राज ठाकरे यांना खटल्यातून वगळण्याचे खंडपीठाचे आदेश!

Aurangabad Bench orders to exclude Raj Thackeray from riot cases : 2008 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करुन त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीमध्ये परळी- गंगाखेड या मार्गावर कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंडळाची एस. टी. बस थांबवून दगडफेक केली.
MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : दंगलीमध्ये एसटी बसवर दगडफेक केल्याच्या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात राज ठाकरे हे प्रत्यक्ष हजर नव्हते, त्यामुळे खटल्यातून राज ठाकरे यांचे नाव वगळण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.

2008 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करुन त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Aurangabad High Court) त्यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीमध्ये परळी- गंगाखेड या मार्गावर कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंडळाची एस. टी. बस थांबवून दगडफेक केली. यावेळी राज ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

या घटनेनंतर एसटी बस चालक शंकर पांचाळ यांच्या तक्रारीवरुन परळी ग्रामिण पोलिस ठाण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह संजय आघाव, अनिस बेग, शिवदास बिंडगर, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांच्या विरोधात भा. द. वि. 143, 427, 336, 109, सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध कायदा कलम 3 व 4 तसेच मुंबई पोलिस कायदा कलम 135 अन्वये परळी वैजनाथ (ग्रामीण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MNS Raj Thackeray News
Ashish Shelar praises Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'दानपट्टा' फिरणार? 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वीच भाजप मंत्री शेलारांनी गोंजारलं

पोलिसांनी तपास करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यातून नाव वगळण्यासाठी राज ठाकरे यांच्यातर्फे ॲड अरुण शेजवळ यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर 21 मार्च रोजी अंतीम सुनावणी झाली. घटनास्थळी राज ठाकरे उपस्थित होते याच्या संदर्भातील कुठलाही पुरवा दोषारोप पत्रात नाही, ते घटनास्थळी नव्हते.

MNS Raj Thackeray News
High Court News : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना खंडपीठाची नोटीस!

चिथावणीखोर भाष्य केल्याबाबत दोषारोप पत्रात पुरावा नाही, त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात फौजदारी खटला चालवणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल असा युक्तीवाद ॲड. शेजवळ यांनी केला. त्यानंतर खंडपीठाने सदर खटल्यातून राज ठाकरे यांचे नाव वगळण्याचे आदेश दिले. उर्वरित खटला मात्र सुरु राहणार आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या तर्फे ॲड. अरुण शेजवळ यांनी काम पाहिले, त्यांना सांची किर्तीकर यांनी सहकार्य केले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com