High Court News : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना खंडपीठाची नोटीस!

Shiv Sena MLA Tanaji Sawant receives a notice from the bench regarding a legal matter : तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. भगीरथ कारखाना तानाजी सावंत यांचे बंधू शिवजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदारसंघातील मतदारांना साड्या, भांडी आणि पैशाचे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमदेवार राहुल मोटे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणुक याचिकाही दाखल केली आहे. सावंत यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या या याचिके प्रकरणी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

माजी आमदार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. औरंगाबाद खंडपीठात याचिकेत तानाजी सावंत यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावंत यांनी मतदारांना साड्या, भांडी आणि पैशाचे वाटप केले आहेत. या संदर्भातील पुरावेही मोटे यांच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

त्यानंतर तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने (High Court) नोटीस बजावली आहे. भगीरथ कारखाना तानाजी सावंत यांचे बंधू शिवजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत हे विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांचा अवघ्या 1509 मतांनी पराभव केला.

Tanaji Sawant News
Tanaji Sawant : आरोग्य विभागात घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांची स्थगिती; अखेर तानाजी सावंतांनी भडास काढली, म्हणाले...

सावंत यांच्या निवडीला आव्हान देत मोटे यांनी खंडपीठात निवडणुक याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 1 लाख 3054 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांना 1 लाख 1745 मते मिळाली. अवघ्या 1509 मतांनी सावंत विजयी झाले.

Tanaji Sawant News
High Court News : उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या निवडीला आव्हान! गैरहजर प्रतिवाद्यांना शेवटची संधी

तानाजी सावंत गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. मुलगा ऋतूराज सावंत यांचा मित्रांसह विमान प्रवास, त्यांच्या बेपत्ता होण्याची पुणे पोलिसात दाखल झालेली तक्रार आणि नंतर त्याला नाट्यमयरित्या मिळालेले वळण याची राज्यभरात चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत याना भेट नाकारल्याच्या चर्चांनीही शिवसेनेत खळबळ उडाली होती. आता आमदार सावंत यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com