
Bacchu Kadu Disqualified News : कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या योजनांसाठी अन्नत्याग आंदोलन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले. सात दिवसांच्या आंदोलनांतर सरकारने समिती स्थापन करण्याचे आश्वासन देत कडूंना हे आंदोलन मागे घेण्यास लावले. मात्र, आता या आंदोलनाचा फटका बच्चू कडूंना बसत असल्याची चर्चा आहे. कारण अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर बच्चू कडूंना यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र ठरवले आहे.
एका प्रकरणात बच्चू कडू यांना एका वर्षाची शिक्षा झाली होती, याचे कारण देत त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून ठरवल्याची माहिती आहे. या वृत्तवाहिनीने कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 'अपात्रतेच्या बाबतची कुठलीही नोटीस आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेली नाही. मात्र, हे आंदोलनाचे परिणाम आहेत. मी काही करायचे नाही म्हणून दबावतंत्र आहे.'
बच्चू कडू म्हणाले, 'याविषयी मी माझी सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडेल. ज्याच्यासमोर सुनावणी झाली होती तो मंत्र्याचा नातेवाईक होता. आंदोलन करून नका बीजेपीचे तंत्रच आहे. विविध गोष्टी वापरून आंदोलन ठेचायचे हे त्यांचे तंत्र आहे.'
बच्चू कडूंनी अपात्रतेच्या निर्णयाच्या आधीच माध्यमांशी संवाद साधतान म्हटले होते की, आंदोलनाच्या अगोदरपासूनच माझ्यावर दबाव आणला जात होता. अमरावती सहकारी बँकेतील माझे सहकारी संचालक देखील मला सांगत होते. तुम्ही जास्त बोलू नका. अडचणी निर्माण होतील. राज्यातील एका मोठ्या माणसाच्या कॅबिनमध्ये बैठक झाली की बच्चू कडू प्रशासकीयस्तरावर कसे अडचणीत येतील ते पाहा. मला जेलमध्ये सप्टेंबरपर्यंत जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता.
परिणाम मला माहित होते.आम्ही लढू. आंदोलनाच्या आधी मला काही लोकांनी फोन केले कशाला आंदोलन करताय जिल्हा बँकेचे अध्यक्षपद जाईल. विविध धमकावण्याच्या बाबी सुरू होते. पद आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीये. शेतकऱ्याचा, मजुराचा, दिव्यांगाचा लढा महत्त्वाचा आहे. शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तो लढू.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.