

Beed News, 30 Oct : राजकीय नेत्यांचे लेटरपॅड आणि बनावट सही करून निधी मंजूर केल्याची अनेक प्रकरण मागील काही काळात उघडकीस आली होती. मात्र, आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बनावट लेटरपॅड आणि बनावट सही केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अजितदादांचे बनावट लेटरपॅड आणि बनावट सही करून जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे सुचविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर हा प्रकार समोर येताच जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार अशोक वाघमारे (रा. लहामेवाडी, ता. माजलगाव) या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक वाघमारेने जिल्हा नियोजन समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचे पत्र दाखवत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लहामेवाडी गावातील विविध विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी केली.
या पत्रात त्याने एकूण 10 कामांचे प्रस्ताव दिले होते. ज्यामध्ये गावातील पोल, एलईडी लाइट बसवणे, हायमॅक्स, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ता, नळकांडी पूल इत्यादी कामांता समावेश होता. यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची तरतूद दाखवली होती. मात्र, या पत्रातील सही संशयास्पद वाटल्याने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या कार्यालयाकडून याची पडताळणी करून घेतली.
त्यावेळी हा सगळा प्रकार बनावट असल्याचं समोर येताच संशयित अशोक वाघमारे याच्याविरुद्ध शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याबाबत असाच प्रकार घडला होता.
लाड यांचे बनावट लेटर पॅड व स्वाक्षरी करून 3 कोटींचा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याचाही सहभाग होता. त्यामुळे आता राजकीय नेत्यांचे लेटरपॅड आणि बनावट सही वापरून निधी मंजूर करण्याची प्रकार वाढल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.