Phaltan Doctor Case : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात अखेर अंजली दमानियांची एन्ट्री; म्हणाल्या, 'अमेरिकेला गेलेले पण आता सगळ्यांची झाडून चौकशी, त्या हॉटेलची अन्...'

Anjali Damania on Phaltan Doctor Death Case : फलटण डॉक्टर तरुणीचं आत्महत्या प्रकरण सुषमा अंधारेंनी लावून धरलं आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील आवाज उठवला . मात्र, या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत अंजली दमानिया यांची काहीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती.
Anjali Damania
Social activist Anjali Damania reacts to the Phaltan doctor Death case, demanding a fair SIT investigation and action against political pressure on medical professionals.Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan Doctor Death Case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येला पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. शिवाय त्यांनी पुराव्यानिशी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

एकीकडे सुषमा अंधारेंनी हे प्रकरण लावून धरलं आहे. अंधारे यांनी या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील आवाज उठवला आहे.

Anjali Damania
Bacchu Kadu Farmers Protest : शेतकरी आंदोलनाची धग आणखी वाढणार! बच्चू कडू फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला निघाले असतानाच जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना

मात्र, या प्रकरणावर आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर दमानिया का बोलत नाहीत? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, अखेर त्यांनी आता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एन्ट्री घेतली असून आपण इतक्या दिवस या प्रकरणावर का व्यक्त झालो नाही, याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.

मी गेले काही दिवस अमेरिकेला असल्यामुळे बीड डॉक्टर केसची माहिती घेता आली नसल्याचं दमिनिया यांनी सांगितलं आहे. परंतू मला काही पत्रकारांनी आणि महिला संघटनांनी जी माहिती दिली ती खूप धक्कादायक असल्याचंह त्यांनी म्हटलं आहे.दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं.

Anjali Damania
Kalyan Receptionist Assault Case : रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; नेमकं काय घडलं?

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी गेले काही दिवस अमेरिकेला असल्यामुळे, मला बीडच्या डॉक्टर लेकीच्या केस ची माहिती घेता आली नाही. पण काही पत्रकारांनी आणि महिला संघटनांनी जी माहिती दिली ती खूप धक्कादायक आहे. कुठल्याही भाजप नेत्याला मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देता कामा नये. सगळ्यांची झाडून चौकशी होणे गरजेचे आहे. आणि तिच्या परिवाराने केलेली मागणी अतिशय योग्य आहे.

ह्यात SIT ची चौकशी झाली पाहिजे आणि ती पोलिसांकडे देण्यात येऊ नये कारण पोलीस त्यांच्याच पोलीस बांधवांवर कारवाई होऊ देणार नाहीत. ही केस सुद्धा बीड न्यायालयात चालली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. तसंच त्या हॉटेलची, संबंधित भाजप नेत्यांची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे.

ह्या वेळी जर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आपल्या जवळच्या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तर अतोनात परिश्रम करून ज्या लेकीला डॉक्टर केले, त्या 28 वर्षाच्या लेकीने प्राण गमवले. आपण त्या आई वडिलांचे काय सांत्वन करणार? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com