Vote Chori : 'भाजप चोर नाही दरोडेखोर, भारतीय राज्यघटना...', माजी मंत्र्याला उपरती

Bachchu Kadu on Vote Chori: 'मत चोरी'च्या मुद्यावर राष्ट्रीय राजकारण तापले आहे. त्यात महाराष्ट्रातून या मुद्यावर भाजपवर माजी मंत्री बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे.
Former Minister Calls BJP 'Thieves, Not Dacoits'
Former Minister Calls BJP 'Thieves, Not Dacoits'Sarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu: राहुल गांधींनी 'मत चोरी'चा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मत चोरी केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. शरद पवार यांनी देखील दोन लोकं आपल्याल भेटील होती. मतं वाढवून देण्याची ते गॅरंटी देत होते, असे म्हटले. आता महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील मत चोरीच्या मुद्दावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

चोर हा दोनशे-तीनशे रुपयांचा चोरी करतो. मात्र भाजपवाल्यांनी तर भारतीय राज्यघटनाच लुटली. भाजप हा 'व्होटचोर' नसून डाकू आहे, अशी जहरी टीका बच्चू कडू यांनी केली.लोकशाहीत मतदान हा आत्मा आहे. मतचोरीतून भाजपवाल्यांनी आत्माच गायब केला. त्यामुळे ही व्होटचोरी नाही तर दरोडा असल्याचा निशाणा त्यांनी साधला.

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूक आयोग, ईव्हीएमवर संशय व्यक्ता केला जातोय त्यामुळे नागरिकांकडून मला प्रश्न विचारला जातोय की कशाला निवडणुकीत उभे राहात. आपल्या विरोधात निकाल येणार आहे कारण माझ्या मतदारसंघात 13 हजार दुबार मतदार निघाले.

Former Minister Calls BJP 'Thieves, Not Dacoits'
Gopichand Padalkar: मला अजित पवारांच्या मुलांची काळजी वाटते! पडळकरांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

भाजप कार्यालयात मतदान केंद्र सुरू करा

आपल्या मतदारसंघात दुबार नावे 13 हजार असल्याचा आरोप करत तब्बल 35 हजार मतदान संशयास्पद असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. 62 ते 100 या वयोगटात जे झालेले मतदान आहे ते संशयास्पद आहे. त्याच्या तपासणीची मागणी आम्ही केली आहे, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व मतदान केंद्रे बंद करून भाजपच्या कार्यालयात मतदान केंद्र सुरू करा, असा टोला देखील लगावला.

Former Minister Calls BJP 'Thieves, Not Dacoits'
Gopichand Padalkar vs Sharad Pawar: बॅलेट पेपरवरही शरद पवारांच्या पक्षाचा पराभव, गोपीचंद पडळकरांनी 'त्या' निवडणुकीचा दाखल दिला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com