Gopichand Padalkar vs Sharad Pawar: बॅलेट पेपरवरही शरद पवारांच्या पक्षाचा पराभव, गोपीचंद पडळकरांनी 'त्या' निवडणुकीचा दाखल दिला

Election Ballot Paper EVM : ईव्हीएमध्ये फेरफार होत असल्याची तक्रार होत आहे. त्यावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पक्षाचा बॅलेट पेपरवरही पराभव झाल्याचे म्हटले आहे.
Gopichand Padalkar Vs Sharad Pawar
Gopichand Padalkar Vs Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी 'मत चोरी' विरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठा लढा सुरू केला आहे. भाजपकडून ईव्हीएम आणि आणि इतर निवडणूक यंत्रणांचा वापर करून निवडणुकीमध्ये मत चोरी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या सर्व गोष्टींवर भाष्य करत ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

पडळकर यांनी शरद पवारांच्या ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यांना आव्हान देताना बारामतीतील मालेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा दाखला दिला आहे. पडळकर म्हणाले, 'मालेगाव साखर कारखान्याची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. तिथे शरद पवारांच्या पक्षाला केवळ 200 मते मिळाली. मग तिथेही शंका उपस्थित करा. त्या निवडणुकीत आमचं, भाजपचं पॅनल नव्हतं, तुमच्याच पुतण्याचं पॅनल होतं. इथेही तुमचा पराभव झाला.निवडणूक आयोग, न्यायालय आणि निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं म्हणजे संविधानाविरोधात बोलणं आहे. या संस्थांवर शंका घेणं चुकीचं आहे.'

'शरद पवारांना जर ईव्हीएम हॅक करून देतो अशी सांगणारी माणसे भेटली असती तर तेव्हाच त्या लोकांना त्या ठिकाणी बसवून ठेवून पोलिसात देणं आवश्यक होतं. त्या दोन माणसांना सांगायला पाहिजे होतं की, हे लोकशाहीच्या विरोधात आहे. याप्रकरणी त्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मात्र मी जर तक्रार दिली नाही तर मी पण गुन्हेगार आहे ना?', असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केला.

त्या दोन माणसांना राहुल गांधींकडे नेणं म्हणजे गुन्हाच आहे. तुम्ही संविधान मानत असाल तर त्याच दिवशी तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे होती, असे देखील त्यांनी सांगितले.

Gopichand Padalkar Vs Sharad Pawar
Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांचा 'मोठा गेम'; अजितदादा, एकनाथ शिंदे गाफील!

मराठा आरक्षणासाठी टोकाची भूमिका...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरही पडळकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने संवेदनशीलतेने 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी दाखले मिळाले आहेत. यापलीकडे टोकाची भूमिका मराठा समाजाच्या हिताची नाही. मराठा समाज हा महाराष्ट्रात एकत्रित कुटुंबपद्धतीप्रमाणे कारभारी म्हणून राहिला आहे आणि सर्व घटकांना जोडणारा आहे, त्यामुळे त्यांना विभागणी करण्याच्या कृत्य जर कोणी करत असेल तर त्यांनी करू नये.

Gopichand Padalkar Vs Sharad Pawar
C P Radhakrishnan : केरळचे प्रभारी, 1998 ला लोकसभेवर अन्...; कसा आहे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com