
Amravati News : माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर सात दिवसांनंतर स्थगित केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेटून राज्य शासनाच्या वतीने त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर कडू (Bachchu Kadu) यांनी उपोषण मागे घेत असल्याची ही घोषणा केली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला होता. त्यामुळे राज्य शासन अस्वस्थ होते
या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राज्य शासनाच्या वतीने आज बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी मंत्री सामंत यांनी कडू यांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील असे आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या आंदोलनात नाशिकच्या गणेश निंबाळकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाग घेतला होता. राज्यभरातून महिला आणि नागरी या आंदोलनात सहभागी झाल्याने वातावरण तापले होते. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही कडूंनी दिला. यानंतर सामंत यांच्याकडून पाणी पित त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने यापूर्वीही प्रशासन तसेच मंत्र्यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि स्थानिक नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे या आंदोलनाचा वनवा राज्यभर पसरू लागला होता.
मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.14) आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. कर्जमाफी हा किचकट विषय आहे. त्यावर राज्य शासनाने लगेचच कार्यवाही करणे अपेक्षित नाही. मात्र, प्रशासनाने त्यावर कार्यवाही करून हा प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमचे आंदोलन हे जात किंवा धर्म याच्याशी निगडित नसल्याने ते अतिशय अवघड होते. त्याला प्रतिसाद मिळणे अतिशय कठीण असतानाही राज्यभरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला.
मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत हात झटकले होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी आता कर्जमाफी या विषयावर कार्यवाहीत आणि हा प्रश्न विचारात घेणार असल्याचे सांगितले आहे. यानिमित्ताने राज्यभरात शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग एकत्र आले हेच आमचे आंदोलनाचे यश आहे, असे कडू यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत हात झटकले होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी आता कर्जमाफी या विषयावर कार्यवाहीत आणि हा प्रश्न विचारात घेणार असल्याचे सांगितले आहे. यानिमित्ताने राज्यभरात शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग एकत्र आले हेच आमचे आंदोलनाचे यश आहे असे कडू यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.