Raj Thackeray : बदलापूर, लाडकी बहीणवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं; म्हणाले, स्वत:चं ब्रँडिंग...

Badlapur Protest CM Eknath Shinde Ladki Bahin : बदलापूर येथे मंगळवारी झालेल्या आंदोलनात लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण हवी, असे फलक दाखवण्यात आले होते.  
Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : बदलापूर येथे शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर निशाणा साधला. आंदोलनात दिसलेल्या लाडकी बहीणच्या फलकावर राजकारण सुरू असतानाच ठाकरेंनीही याच योजनेवरून शिंदेना सुनावलं आहे.

राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करून कारवाई वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हटलो तसे, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटले.

Eknath Shinde, Raj Thackeray
Sameer Meghe : आमदार मेघेंच्या पराभवासाठी आघाडीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’; निवडणुकीपूर्वीच 30 हजार मते कापणार?

मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, असा निशाणा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर साधला. लाडकी बहीण योजनेतून स्वत:चे ब्रॅंडिंग सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Eknath Shinde, Raj Thackeray
Chirag Paswan : चिराग पासवान पाच खासदारांच्या ताकदीवर थेट मोदींना भिडतात! आज आगडोंब उसळला...

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी सरकारला सुनावलं. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजे आहे, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com