BJP Politics : विधानसभा निवडणुकीत राणा नको, भाजप पदाधिकारी आक्रमक

Ravi Rana BJP Badnera Constituency : वरिष्ठ भाजपशी जवळीक आणि खालच्या भाजप कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नको. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
Navneet Rana, Ravi Rana
Navneet Rana, Ravi RanaSarkarnama

Badnera Assembly Constituency News : लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला होता. तरीदेखील त्यांना तिकीट देण्यात आले. मात्र, स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा फटका नवनीत राणा यांना बसला.

त्यांना काँग्रेस उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा तयारी करत आहेत. मात्र, हा मतदारसंघ महायुतीने भाजपला सोडावा आणि स्थानिक भाजप उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी करत आहेत.

अमरावती भाजपच्या जिल्हा बैठकीत रवी राणा यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. महायुतीमध्ये बडनेराची जागा भाजपला मिळायली हवी,असा निर्णय या बैठकीत झाल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

रवी राणा यांचे भाजपातील BJP वरिष्ठ नेत्यांची चांगले संबंध आहेत. नवनीत राणा यांनी पराभूत झाल्यानंतर त्या भाजपसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रवी राणा यांची 'युवा स्वाभिमान पार्टी' आहे.

याच पक्षाकडून ते विधानसभा निवडणुकीत उतरतील. सध्या ते बडनेराचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचा घटक म्हणून ही जागा आपल्याला सोडावी, अशी मागणी रवी राणा यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Navneet Rana, Ravi Rana
Maharashtra MLC Elections 2024: दगाफटका टाळण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सला वेग; आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये!

रवी राणा Ravi Rana यांचे वरिष्ठ भाजप नेत्यांशी चांगले संबंध असले तरी स्थानिक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे वरिष्ठ भाजपशी जवळीक आणि खालच्या भाजप कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नकोच. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना उमेदवारी देऊ नका याबाबत वरिष्ठ भाजपच्या वरिष्ठ श्रेष्ठींना सांगणार असल्याचे स्थानिक भाजप नेते म्हणत आहे.

फडणवीस निर्णय घेणार?

अमरावती जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी रवी राणा यांना कडाडून विरोध केला आहे. राणा नकोच, अशी भूमिका स्थानिक नेते घेत आहेत. मात्र, या विषयी अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Navneet Rana, Ravi Rana
Video BJP Politics : शिंदे गटाला 70 तर भाजपला 160 जागा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबावतंत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com