Maharashtra MLC Elections 2024: दगाफटका टाळण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सला वेग; आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये!

MLA's Staying in Five Star Hotel in Mumbai : भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट यांनी खबरदारी घेत आपल्या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या (12 जुलै) मतदान होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आता हॉटेल पॉलिटिक्सला आता वेग आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट यांनी खबरदारी घेत आपल्या आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलाआहे. कुठलाही दगाफटका होऊ नये, मते फुटू नयेत म्हणून पक्षांनी ही खबरदारी घेतली आहे.

भाजपने आपल्या आमदारांची व्यवस्था ही कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे. शिवसेना शिंदे गटाने आपल्या आमदारांची व्यवस्था वांद्रे येथील 'ताज लॅण्डस एंड'हॉटेलमध्ये केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची व्यवस्था परळ येथील 'आयटीसी ग्रॅण्ड'मध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे ललित हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.

Maharashtra Politics
Pooja Khedkar: चमकोगिरी करणाऱ्या IAS पूजा खेडकर यांना रुबाब नडला; ऑडी कारवर लावलेला लाल दिवा भोवला!

महायुतीकडून 1 उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे. विधान परिषदेच्या 11 आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक होत आहे.

महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री या निवडणुकीत महाविकास आघाडीचा राजकीय 'गेम'करणार असल्याचे बोलले जाते.

भाजपने पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. मतदान कसे करायचे यांचे मॉकड्रील घेण्यात आले. फडणवीस यांनी आपल्या आमदारांना मतदान कसं करायचे यांचे मार्गदर्शन केले.

आज दुसरी मॉकड्रील होणार असल्याचे समजचे. याला केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपकडे अधिकची दोन मते कमी आहे. पण वेळेवर ही दोन मते मिळतील, असा विश्वास भाजपला आहे.

Maharashtra Politics
Pune Congress: विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसचा नवा फाॅर्म्युला; नव्या चेहऱ्यांना संधी?

पक्षीय बलाबल

  • महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट (12), काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे.

  • महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com