Congress News : शिंदे, फडणवीसांना कर्माची फळं भोगावी लागणार, काँग्रेस नेता भडकला

Balasaheb Thorat eknath shinde Devendra Fadnavis : संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Congress News : शांत संयमी नेते म्हणून बाळासाहेब थोरात परिचित आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप नेते अनिल बोंडे, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बाळासाहेब थोरांनी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

'संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच पण यांच्या कर्माची फळं यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत.', असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत 'भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची सुस्कृंत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग 2014 ला सुरु झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे.', असे म्हटले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Female Chief Minister : राज्यात महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा, ती पुढे सरकणार की पुन्हा खुंटणार?

वाचाळवीरांना शिंदे, फडणवीसांचा पाठींबा

'भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे.' असे देखील बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत, असे देखील थोरात म्हणाले आहेत.

गायकवाड, बोंडे काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी अमेरिकेच्या दौऱ्यात वक्तव्य केले होते. त्याविरोधात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले होते. तर, भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, मी राहुल गांधी यांची जीभ कापा असे म्हणणार नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या जीभेला चटका द्यायला पाहिजे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Video Dhangar Reservation :...तर सर्व आमदार राजीनामा देणार, धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com