Video Dhangar Reservation :...तर सर्व आमदार राजीनामा देणार, धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला

Dhangar Reservation Hiraman Khoskar: सोमवारी सर्वपक्षीय आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.धनगरांना वेगळं आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिलं तर आम्हाला काहीच मिळणार नाही, अशी भीती देखील खोसकर यांनी व्यक्त केली.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation : एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती नेमणार असल्याचे आश्वासन दिले तसेच धनगड आणि धनगर शब्द एकच असल्याविषयी जीआर काढण्याची देखील तयारी दाखवली.

मात्र, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांचा विरोध आहे. जर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिले तर सर्वपक्षातील आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा आमदार हिरामण कोसकर यांनी सरकारला दिला.

धनगर आरक्षणाला विरोध नाही. मात्र, त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, असे आमदार कोसकर म्हणाले. सोमवारी सर्वपक्षीय आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.धनगरांना वेगळं आरक्षण द्या. त्यांना एसटीतून आरक्षण दिलं तर आम्हाला काहीच मिळणार नाही, अशी भीती देखील खोसकर यांनी व्यक्त केली.

Dhangar Reservation
Dhangar reservation : मोठी बातमी! धनगर आरक्षणासाठी सरकार जीआर काढणार, 'त्या' शब्दातील संभ्रम दूर होणार?

24 आमदार राजीनामा देणार

हिरामण खोसकर यांनी राज्य सरकारला इशारा देताना म्हटले की, सर्वपक्षीय आदिवासी आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. धनगर समाजाला जर आदिवासींमधून आरक्षण दिले तर 24 आमदार राजीनामा देतील. मीतर लगेच राजीनामा देईल.

सरकार जीआर काढणार?

धनगड आणि धनगर एकच आहेत त्याविषयी स्वतंत्र जीआर काढण्याच्या मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे तीन वरिष्ठ अधिकारी आणि सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील पाच सदस्यांची समितीची स्थापना करण्यात येईल.

जीआरचा मसूदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे. त्यासाठी ही समिती पुढील चार पाच दिवसात बैठक घेईल त्याप्रमाणे ड्राफ्ट तयार करेल. अॅडव्होकेट जनरल यांचे यावर मत घेतले जाईल, असे देखील शंभूराज देसाई यांनी सांगितले होते.

Dhangar Reservation
Video One Nation One Election : अखेर ठरलं! एक देश एक निवडणूक होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com